

Balasaheb Patil
sakal
कऱ्हाड : पालिकेच्या निवडणुका शांततेत झाल्या. मात्र, नंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांत वाद होत आहेत. त्या वादावर निष्पक्षपातीपणे काम होणे अपेक्षित असताना प्रशासन दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांवर अन्याय होणार असेल, तर सहन करणार नाही. त्याला निश्चित योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा माजी मंत्री, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.