निवडणुकीत शिवसेनेकडून राष्ट्रवादीचा 'करेक्ट कार्यक्रम'; Shambhuraj Desai गटाचा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai

पाटणकर गटाच्या राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.

निवडणुकीत शिवसेनेकडून राष्ट्रवादीचा 'करेक्ट कार्यक्रम'

मोरगिरी (सातारा) : पाटण तालुक्यातील चोपडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत (Chopadi Society Election) शिवसेना (Shiv Sena) पुरस्कृत निनाईदेवी ग्रामविकास पॅनेलने सर्व जागा जिंकत सोसायटीची सत्ता अबाधित ठेवली. पाटणकर गटाच्या राष्ट्रवादी (NCP) पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांचा पराभव झाला.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या निवडणुकीत शंकर चव्हाण, अरुण जाधव, अण्णा जाधव, उत्तम जाधव, कुशाबा जाधव, नाथा जाधव, नारायण जाधव, सूर्यकांत जाधव, सरसाबाई जाधव, दीपाली पाटील हे उमेदवार विजयी झाले आहेत. यापूर्वी विलास माळी, सुरेश चव्हाण हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर एक जागा रिक्त राहिली आहे.

हेही वाचा: वाठार, बेलवडे, आणे सोसायटीवर भाजपच्या भोसलेंचं वर्चस्व

पाटणकर गटाच्या राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांचा पराभव झाला. विजयी उमेदवारांचे गृहराज्यमंत्री देसाई, युवा नेते यशराज देसाई, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, सरपंच विश्वास पाटील, उपसरपंच अजित पुजारी, एम. बी. चव्हाण नाथा जाधव यांनी अभिनंदन केले.

Web Title: Candidate Of Shambhuraj Desai Group Won In Chopadi Seva Society Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..