साताऱ्यात मृत्यूतांडव! जिल्ह्यात 24 तासात 22 बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे.
Coronavirus
CoronavirusCoronavirus

सातारा : गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाबाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत असून, कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा कहर झाला आहे. जिल्ह्यात आज एक हजार 184 बाधित रुग्ण आढळले असून,22 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील वाढत्या मृत्यूंची संख्या चिंताजनक आहे.

जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. सुरवातीला मृत्यूचे प्रमाण कमी होते, तर बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून बाधित आणि मृत्यूंचीही संख्या वाढत असल्याने भीतीदायक वातावरण आहे. जिल्ह्यात आज आढळलेली बाधितांची रुग्णसंख्या आजपर्यंतची सर्वांत उच्चांकी रुग्णसंख्या आहे. आज जिल्ह्यात कोरोनामुक्त झाल्याने 610 नागरिकांना घरी सोडण्यात आले.

क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात आनेवाडी (ता. जावळी) येथील 44 वर्षीय पुरुष, महाबळेश्‍वर येथील 76 वर्षीय महिला, जरेवाडी (ता. सातारा) येथील 64 वर्षीय महिला तसेच खासगी रुग्णालयात कामेरी (ता. सातारा) येथील 81 वर्षीय महिला, चिंचणेर (ता. सातारा) येथील 70 वर्षीय महिला, सातारा येथील 70 वर्षीय व 84 वर्षीय पुरुष, गोंदवले (ता. माण) येथील 37 वर्षीय पुरुष, सातारा येथील 76 वर्षीय महिला, राजेवाडी (ता. खंडाळा) येथील 58 वर्षीय पुरुष, बावधन (ता. वाई) येथील 70 वर्षीय पुरुष, तारुख (ता. कऱ्हाड) 80 वर्षीय पुरुष, औंध (ता. खटाव) येथील 63 वर्षीय पुरुष, वडूज (ता. खटाव) येथील 37 वर्षीय पुरुष, पुणे येथील 60 वर्षीय महिला व 48 वर्षीय पुरुष, सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, कऱ्हाड येथील 90 वर्षीय महिला, ओगलेवाडी (ता. कऱ्हाड) येथील 74 वर्षीय पुरुष, मांडवे (ता. सातारा) येथील 65 वर्षीय पुरुष, फलटण येथील 53 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकूण 22 बाधितांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.

Edited By : Balkrishna Madhale

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com