गोंदवलेकरांनाे सावधान! कोरोनाचा शिरकाव वेळीच राेखा

फिरोज तांबोळी
Monday, 25 January 2021

चार बाधितांवर उपचार सुरू असून इतर बाधितांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने केले आहे.

गोंदवले (जि. सातारा) : गेल्या महिनाभरात एकही कोरोनाबाधित नसलेल्या गोंदवले बुद्रुकमध्ये अवघ्या पाच दिवसांतच कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. येथे एकाचा मृत्यू झाल्याने स्थानिक प्रशासनाने गोंदवलेकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
 
देशात मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर तातडीने उपाययोजना केल्याने गोंदवल्यात तीन महिन्यांपर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता. जूनमध्ये मात्र गावात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर खबरदारी घेऊनही कमी-जास्त प्रमाणात रुग्णसंख्या वाढत होती. परिणामी काही वेळा संपूर्ण गावात उत्स्फूर्तपणे लॉकडाउन पाळून लोकांनी सहकार्य केले होते. अनलॉकनंतरही येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरही शासनाच्या नियमांचे पालन करतच दर्शनासाठी खुले करण्यात आले. "श्रीं'च्या पुण्यतिथी महोत्सव काळात तसेच इतर वेळी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन समाधी मंदिर तसेच आठवडा बाजार बंद ठेवून काळजी घेतली गेली. परिणामी गेल्या महिनाभरात गावात कोरोनाबधितांची संख्या शून्यच होती.
 
गेल्या काही दिवसांपासून मात्र कोरोनाने गावात पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मागील पाच दिवसांत रुग्णसंख्या 16 झाली आहे. त्यातच एका कोरोनाबधिताचा मृत्यू झाल्याने काळजीत भर पडली आहे. चार बाधितांवर उपचार सुरू असून इतर बाधितांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने केले आहे.

शरद पवारांच्या सातारा दौऱ्याला आमदारांनी खो घातला? पालकमंत्र्याची चुप्पी

शेतक-याने दिला जून्या परंपरेला उजाळा; वाणवसासह लाडक्या लेकीची पाठवणी केली बैलगाडीतून

Lockdown Effect : शिकाऱ्यांनी टिपले 79 वन्यजीव; वन गुन्ह्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ

कुडाळात सत्ता स्थापनेसाठी पॅनेलचे हाेणार मनाेमिलन?

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 19 Patient Increased In Gondawale Satara Marathi News