'शिवसैनिकांचा पराभव केलाय; इशारा-धमक्यांना भीक घालत नाही'

Shambhuraj Desai
Shambhuraj Desaiesakal
Summary

'शिवसैनिकांचा पराभव केला, इशारा-धमक्यांना भीक घालत नाही, हा ट्रेलर आहे, पिक्चर दाखवू.'

पाटण (सातारा) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील (Satara District Bank Election) जय-पराजयाच्या निमित्ताने पाटण तालुक्यातील राजकीय वातावरण धुमसू लागले आहे. दोन्ही नेत्यांनी सातारा येथे माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रिया आणि तालुक्यात झालेल्या पत्रकार परिषदांतून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्याने दोन वर्षे शांत असणारे राजकीय वातावरण पुन्हा मूळ पदावर आले आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक दोन्ही गटांकडून प्रतिष्ठेची झालेली होती. मतमोजणी सुरू होईपर्यंत पाटणकर-देसाई समर्थकांकडून विजय आमचाच होणार, असे दावे केले जात होते. मात्र, पाटणकर समर्थक मतदार पाटणकरांशी व देसाई समर्थक देसाईंशी ठाम राहिल्याने सत्यजितसिंह पाटणकर (Satyajitsingh Patankar) यांचा 14 मतांनी विजय झाला. विजय घोषित झाल्यानंतर सत्यजितसिंह पाटणकर यांनी सातारला माध्यमांशी बोलताना जिल्हा बँक निवडणुकीत परिवर्तनाची नांदी असून, सत्तेची आणि पैशाची मस्ती आणि माज सर्वसामान्य मतदारांनी उतरवला, अशी मंत्री देसाई यांच्या विरोधात प्रतिक्रिया दिली आणि आरोपांच्या फैरी झडू लागल्या. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सातारला पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेत्यांवर राग व्यक्त केला व अर्ज माघार घेईपर्यंत फक्त चर्चा केली, अशी प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी सत्यजितसिंह पाटणकरांचे नाव न घेता प्रतिस्पर्धी उमेदवार १२० मतांच्या निवडणुकीला परिवर्तन म्हणत नाहीत, असा आरोप केला.

Shambhuraj Desai
NCP उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन उपाध्यक्षांचा राजीनामा

खुल्या वातावरणात निवडणुका न घेता दिवाळी सणालाही मतदारांना घराच्या बाहेर का ठेवले, याचा विचार जनतेला करायला लागल्याचे स्पष्टीकरण दिले. उंब्रज ते पाटण अशा विजयी मिरवणुकीच्या शेवटी झालेल्या विजयी सभेतही सत्यजितसिंह यांनी आक्रमकपणे शंभूराज देसाईंना डिवचण्याचे काम केले. हा सुरू असलेला आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला एवढ्यावर थांबला नाही. पुन्हा सत्यजितसिंह पाटणकरांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीच्या (NCP) कृपाशिर्वादाने देसाई मंत्री, शिवसेनेशी एकनिष्ठ नाहीत, राजकीय भोंगा कशासाठी वाजवताय, जिल्हा परिषदेत शिवसैनिकांचा पराभव केला, इशारा धमक्यांना भीक घालत नाही, हा ट्रेलर आहे, पिक्चर दाखवू, असे आरोप करून पुन्हा मंत्री देसाईंना डिवचले.

Shambhuraj Desai
'धनशक्तीच्या जोरावरील सत्तेची मस्ती उतरवत तुम्हाला घरी बसवलंय'

मंत्री देसाई यांनी त्यास पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले. माझ्या मंत्रिपदाची भीती का वाटते, राष्ट्रवादीच्या मेहेरबानीवर आपण आमदार का झाला नाही, वाड्यातून बाहेर न पडणाऱ्यांना आणि त्यांची निष्क्रीयता माहीत असलेल्या जनतेने सात वर्षे घरी बसविले, धनशक्तीची मस्ती उतरवली, जिल्हा बँकेत हाताची घडी तोंडावर बोट ती परंपरा पुन्हा, १४ मतांच्या जोरावर राजीनामा मागणाऱ्या सत्यजितसिंहांची तेवढी उंची नाही, मंत्रिपद कर्तृत्व व निष्ठेवर मिळते, अशा आरोपांच्या फैरी झाडल्या. दोन वर्षे पारंपरिक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी बंद होत्या. त्या जिल्हा बँकेच्या निमित्ताने पुन्हा झडू लागल्याने अवकाळीच्या वातावरणात पुन्हा राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे.

Shambhuraj Desai
'बंटी पाटलांनी जवळीकता इतकी वाढवली, की भाजपलाही पत्ता लागला नाही'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com