Devendra Fadnavis: यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीला मुख्यमंत्री फडणवीस कऱ्हाडला का अनुपस्थित? दोन वर्षांपासून समाधिस्थळी अभिवादन नाही; राजकीय वर्तुळात चर्चा

Fadnavis Skips Karad Memorial Visit for Second Year in a Row: यशवंतरावांचा वारसा केवळ भाषणापुरता? मुख्यमंत्र्यांच्या कऱ्हाड अनुपस्थितीवर यशवंतप्रेमींची अपेक्षा
Yashwantrao Chavan Death Anniversary CM Devendra Fadnavis Absent at Karad Memorial for Second Year in a Row

Yashwantrao Chavan Death Anniversary CM Devendra Fadnavis Absent at Karad Memorial for Second Year in a Row

sakal

Updated on: 

कऱ्हाड: कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर विसावलेल्या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या समाधिस्थळी अभिवादन करण्याची राज्याच्या राजकीय वर्तुळातील एक प्रतिष्ठित परंपरा आहे.२५ नोव्हेंबरला मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि मान्यवर कऱ्हाडमध्ये येऊन यशवंतरावांना अभिवादन करतात. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या दोन वर्षांपासून कऱ्हाडमधील समाधिस्थळी अभिवादनासाठी आलेले नाहीत. मुंबईतूनच यशवंतरावांना अभिवादन केले जात असल्याने त्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा आता राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

Loading content, please wait...