
एका गायीला पाठीमागे शंभर रुपये पदरमोड करून दूध व्यवसाय करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी जगायचं कसं? असा संतप्त सवाल दूध उत्पादक शेतकरी (Farmers) करत आहेत.
Milk Rate : शेतकऱ्यानं जगायचं तरी कसं? कांद्यापाठोपाठ दूध दरातही मोठी घसरण
तिरकवाडी : सध्या दराअभावी कांदा (Onion Rate) शेतकऱ्याच्या दारातच सडत आहे. तर दुधाचे दर (Milk Rate) घसरल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणी सापडला आहे. एका गायीला (Cow) दररोज पेंड व चारा याचा खर्च पाचशे रुपये होत असून, दुधातून चारशे रुपये मिळत आहेत.
एका गायीला पाठीमागे शंभर रुपये पदरमोड करून दूध व्यवसाय करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी जगायचं कसं? असा संतप्त सवाल दूध उत्पादक शेतकरी (Farmers) करत आहेत. शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दुधासाठी लिटरला ३८ रुपये दर मिळत होता. त्यावेळी चार पैसे शिल्लक राहत होते; परंतु सध्या दर २४ रुपयांवर आला आहे. प्रत्यक्षात मात्र ३१ अथवा ३२ रुपये दर मिळत आहे. ५० किलो पेंडीचं पोतं १६५० रुपये तर ४५ किलो भुश्याचे पोते तेराशे रुपयांना मिळत आहे. एका गायीला दररोज सहा किलो पेंड व दोन किलो भुस्सा तसेच वैरण असा पाचशे रुपयांचा खर्च होत आहे.
याबाबत वांजळे-वडले (ता. फलटण) येथील दूध उत्पादक शेतकरी अमोल नाळे म्हणाले, ‘माझ्याकडे ७० गायी असून, दिवसाला ४२० लिटर सरासरी एक गायी सरासरी १३ ते १४ लिटर दूध देते. ४२० लिटरचे ३२ रुपयांनी १३ हजार ४४० रुपये होत आहेत. तर पेंड व चाऱ्याचा खर्च १५ हजार रुपये होतो. रोजचा दीड ते दोन हजार रुपये तोटा कोठून भरून काढणार? शासनाने दूध दरात लक्ष न घातल्यास दूध व्यवसाय अडचणीत येऊन बंद पडण्याची भीती आहे.