esakal | satara news karad news

बोलून बातमी शोधा

Patan Taluka
पाटण तालुक्यात भररस्त्यात फिल्मी स्टाईल हाणामारी
sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

ढेबेवाडी (जि. सातारा) : गुढे (ता. पाटण) येथे सायंकाळी दोन युवकांमध्ये भर रस्त्यात जोरदार हाणामारी सुरू असतानाच पोलिस घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. यातील एका युवकाजवळ पिस्तूल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मारामारीत एक युवक गंभीर जखमी झाला आहे.

काल (सोमवारी) साडेसहा वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी-कराड मार्गावरील गुढे बस थांब्याजवळ ही घटना घडली. दोन युवकांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू असतानाच ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांचे सहकारी तळमावलेकडून ढेबेवाडीकडे वाहनातून निघाले होते. मारामारी करणाऱ्या एकाच्या हातात लोखंडी पाईप तर दुसऱ्याच्या हातात पिस्तूल सापडले.

काळजी घ्या! परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे : रामराजे नाईक - निंबाळकर

घटनेचे गांभीर्य ओळखून ढेबेवाडी पोलिसांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेतले. मात्र, तत्पूर्वीच यातील एकाच्या डोक्यात घाव घातल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. पोलिसांनी ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका बोलावून जखमी युवकास उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. पिस्तूलधारी युवक कुणाच्या मागावर होता? तो कुणाचा गेम करणार होता? मारामारीचे नेमके कारण काय, याची चौकशी करण्याचे काम पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

गुढीपाडवा : कडुलिंब खाण्याच्या परंपरेला सलग दुसऱ्या वर्षी ब्रेक; गावागावांत शुकशुकाट

पोलिसांमुळे अनर्थ टळला..

वर्दळीच्या रस्त्यावर गुढे बसथांब्याजवळ दोन युवकांत तुंबळ हाणामारी सुरू असतानाच पोलिस हजर झाल्याने मोठा अनर्थ टळला. अगदीच चित्रपटातील प्रसंगाप्रमाणेच हा प्रसंग होता. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. युवकाच्या हातात पिस्तूल असतानासुद्धा पुढे जाण्याचे धाडस ढेबेवाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांनी केल्याने मोठा अनर्थ टळला. त्यांच्या धाडसाचे उपस्थितांतून कौतुक होत होते.