वारकरी संघटनेच्या मागण्यांचा पाठपुरावा करू : आमदार पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारकरी संघटनेच्या मागण्यांचा पाठपुरावा करू : आमदार पाटील

वारकरी संघटनेच्या मागण्यांचा पाठपुरावा करू : आमदार पाटील

पसरणी : कीर्तन, प्रवचन, भजन या माध्यमांतून प्रबोधन करताना वारकरी संघटनेने व्यसनमुक्त महाराष्ट्र घडविण्याची जबाबदारी घेतली आहे. या परंपरेत वारकरी साहित्य परिषद भर घालेल. वारकऱ्यांच्या मागण्यांचा राज्य विधिमंडळात पाठपुरावा करू, असे आश्वासन आमदार मकरंद पाटील यांनी दिले.

हेही वाचा: T20 WC: एक आफ्रिदी दुसऱ्या आफ्रिदीवर संतापला, म्हणाला...

वारकरी साहित्य परिषदेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. नगराध्यक्ष अनिल सावंत, वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष अंकुश जाधव महाराज, प्रमोद शिंदे, रमेश गायकवाड, नगरसेवक भारत खामकर, चरण गायकवाड, दीपक ओसवाल, प्रदीप जायगुडे, अजित भोईटे, चंद्रकांत बावळेकर, सीमा जाधव, माऊली मरगजे, राम कदम, बाबा गजवडीकर, हणमंत सोडमिसे, सोनाली चव्हाण उपस्थित होते.

दिलीप वाडकर म्हणाले, ‘‘ओवी, अभंग, गवळण ही परंपरा जिवंत ठेवण्याचे काम वारकऱ्यांनी केले आहे. या मौखिक साहित्याचा ठेवा जतन करण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेची निर्मिती आहे. संत साहित्य समाजधन व्हावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या वारकरी व कलावंतांना शासनाचे मानधन मिळावे.’’ संघटनेचे वाई तालुका अध्यक्ष अशोक पाटणे यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचा: स्मशानभूमीत आंदोलन करून राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा

यावेळी परिषदेच्या विविध तालुक्यातील पदाधिकारी व सदस्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तालुकाध्यक्ष भरत बागल, बाजीराव नवघणे, शिवाजी गाढवे, बबन सपकाळ, शिवाजी चव्हाण, रामचंद्र चिकणे, दत्तात्रय भोसले यांनी स्वागत केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा संपर्कप्रमुख संदीप गबाले यांनी आभार मानले.

loading image
go to top