Uddhav Thackeray : पक्षात आऊट गोईंग सुरू असतानाच ठाकरेंना मोठा दिलासा; 'या' नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन

गुजर त्यांच्या समर्थकांसह शिवबंधनात आल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाला कऱ्हाडला वाव मिळणार आहे.
Indrajit Gujar joins Shiv Sena Thackeray Group Mumbai
Indrajit Gujar joins Shiv Sena Thackeray Group Mumbaiesakal
Updated on
Summary

शिवसेनेत प्रवेश झाला आहे. लवकरच पक्ष संघटनेचे पद मिळणार आहे. त्यामुळे त्यानंतर कऱ्हाडला मोठा कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे.

कऱ्हाड : येथील माजी नगरसेवक इंद्रजित गुजर (Indrajit Gujar) यांचा शिवसेना ठाकरे गटात (Shiv Sena Thackeray Group) प्रवेश झाला. मुंबईत मातोश्रीवर झालेल्या प्रवेशात पक्षप्रमुख ठाकरे, आदित्य ठाकरे, उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष हर्षद कदम उपस्थित होते.

गुजर त्यांच्या समर्थकांसह शिवबंधनात आल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाला कऱ्हाडला वाव मिळणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर श्री. गुजर यांनी शिवबंधन बांधले. गुजर यांचा प्रवेश होणार असल्याने त्यांचे समर्थक मुंबईला आले होते.

Indrajit Gujar joins Shiv Sena Thackeray Group Mumbai
ना बोर्डावर नाव, ना नेत्याचा फोटो..; मुश्रीफांच्या मतदारसंघात झळकला 'साहेबप्रेमी' बॅनर, उलट-सुलट चर्चांना उधाण

गुजर यांचा मातोश्रीवर पक्षप्रवेश झाला. त्यासाठी ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती. मातोश्रीवर प्रवेशानंतर गुजर व श्री. ठाकरे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. अनेक मुद्द्यांवर गुजर यांची त्यांनी मते जाणून घेतली. यावेळी उपनेते बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष कदम उपस्थित होते.

काहीकाळ चर्चेनंतर श्री. गुजर यांचा प्रवेश पार पडला. श्री. ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. ठाकरे गटातील नेते, उपनेते या वेळी उपस्थित होते. या वेळी पुष्पगुच्छ देऊन श्री. गुजर यांचे स्वागत करण्यात आले. श्री. गुजर यांनी पक्षसंघटनेवर लक्ष देण्याची ग्वाही या वेळी दिली.

Indrajit Gujar joins Shiv Sena Thackeray Group Mumbai
NCP Crisis : राष्‍ट्रवादीचं 'घड्याळ' चिन्ह कोणाला मिळणार, अजितदादा की शरद पवार? देसाईंनी स्पष्टच सांगितलं..

कऱ्हाडला मेळाव्याचे नियोजन

गुजर म्हणाले, ‘‘शिवसेनेत प्रवेश झाला आहे. लवकरच पक्ष संघटनेचे पद मिळणार आहे. त्यामुळे त्यानंतर कऱ्हाडला मोठा कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे. शिवसेनेच्या संघटनात्मक कामाला लागणार आहे. शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचा भाग आहे. त्यानुसार पक्षातील ज्येष्ठांच्या सूचना येतील, त्याप्रमाणे काम करणार आहोत.’’

Indrajit Gujar joins Shiv Sena Thackeray Group Mumbai
Mumbai Court : कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच मुश्रीफांना मोठा दिलासा; कोर्टानं अटकेबाबत घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.