esakal | कोरोनामुक्ती 88.25 टक्‍क्‍यांवर; कऱ्हाडात दाेन टक्केच बाधित

बोलून बातमी शोधा

Covid19
कोरोनामुक्ती 88.25 टक्‍क्‍यांवर; कऱ्हाडात दाेन टक्केच बाधित
sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड तालुक्‍यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 13 हजारांवर गेला आहे. तरीही 88.55 टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा दर 2.98 टक्के आहे. त्यामध्ये जुन्या व्याधी असलेल्या नागरिकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. आजअखेर 365 जणांनी जीव गमावला आहे. त्यातील 199 कोरोनाग्रस्तांना जुन्या व्याधी होत्या. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या व्याधी बळावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे.

कऱ्हाड तालुक्‍यात कोरोनाने आजअखेर 369 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 199 रुग्णांना अन्य व्याधी होत्या. त्यात मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनीसह अन्य आजार असणारे कोमॉर्बिट रुग्ण जास्त असल्याची माहिती आरोग्य विभागाने नोंदवली आहे. व्याधीग्रस्त रुग्णांची भीतीही मृत्यूला कारणीभूत ठरत आहे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी स्पष्ट केले. मात्र, तरीही तालुक्‍यातील कोरोनामुक्तीचा टक्काही वाढतो आहे. तालुक्‍यातील कोरोनामुक्तीचा दर दिलासा देणारी आहे. तालुक्‍याचा रुग्ण बरा होण्याचा रिकव्हरी रेट 88.25 टक्के आहे, तर मृत्यूदर 2.98 टक्के आहे. त्यात तालुक्‍याची लोकसंख्या पाच लाख 87 हजार 411 आहे. त्यामुळे लोकंसख्येनुसार केवळ 2.06 टक्के नागरिकच बाधित आहेत. कोरोना चाचणीच्या प्रमाणात तेच प्रमाण 14.06 टक्के इतके आहे. कोरोनाबाधिताचा मृत्यू होण्यामागे अन्य आजार व नाहक भीती कारणीभूत असली तरी मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तातडीने चाचणी करण्यासह वेळेत उपचार घेतल्यास कोमॉर्बिट रुग्णही बरा होतो आहे.

..तर ग्रामपंचायतीत मिळणाऱ्या दाखल्यांनाही मुकावे लागणार!

पालकमंत्री बाळासाहेब पाटील आता तुम्हीच प्रशासनाचा इलाज करा!

कोरोनाची दुसरी लाट वेगवान आहे. लक्षणे जाणवताच त्याचे संक्रमण कित्येक पटीने वाढले आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात चिंतेचे काहूर आहे. आजअखेर सर्वाधिक रुग्ण एप्रिलमध्ये आढळले आहेत. सध्या तालुक्‍यात 13 हजार 54 रुग्ण आहेत. शहरात तीन हजार 112, मलकापुरात एक हजार 561, तर ग्रामीण भागात आठ हजार 381 रुग्ण आहेत.

जुन्या व्याधी असणारांनी कोरोनाची लक्षणे जाणवताच त्वरित चाचणी करून घ्यावी. ती लक्षणे किंवा होणारा त्रास लपवू अथवा अंगावरही काढू नये. त्यामुळे निदान करण्यास विलंब होतो. परिणामी, उपचारालाही गती मिळत नाही. त्यामुळे अनेकदा रुग्ण दगावण्याची भीती असते. त्यामुळे तातडीने चाचणी व औषधोपचार करणे कोरोनामुक्तीसाठी गरजेचे आहे असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी नमूद केले.

माझे लग्न 26 एप्रिलला आहे, मला पळवून न्या.. तुमची पुष्पा, आय लव्ह यू

सातारकरांनाे! इथं मिळेल तुम्हांला ऑक्‍सिजन बेड