esakal | सातारकरांनाे! इथं मिळेल तुम्हांला ऑक्‍सिजन बेड

बोलून बातमी शोधा

Covid 19 Bed
सातारकरांनाे! इथं मिळेल तुम्हांला ऑक्‍सिजन बेड
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ झाली आहे. सध्या बेड शिल्लक नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या स्थितीला आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, या हेतूने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) , वेदांतिकाराजे भोसले व कुटुंबीयांनी पुष्कर मंगल कार्यालयात पुन्हा कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेंटरमध्ये 32 ऑक्‍सिजनयुक्त बेडसह (Oxygen Bed) 80 बेडचे हे सेंटर रुग्णसेवेसाठी सज्ज होत असून, येत्या दोन दिवसांत हे सेंटर सुरू होणार आहे.

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांनी पुष्कर हॉल येथे स्वखर्चाने 80 बेडचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभारून विनामोबदला रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून दिले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे सेंटर बंद करण्यात आले होते. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत आणि बेड मिळाला नाही म्हणून कोणाचा जीव जाऊ नये, या हेतूने शिवेंद्रसिंहराजे यांनी सेंटर पुन्हा रुग्णसेवेसाठी स्वखर्चाने तयार करून श्वास हॉस्पिटलकडे चालवण्यासाठी दिले आहे. कठीण परिस्थितीत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, याच उद्देशाने सेंटर पुन्हा सुरू करत असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

हेही वाचा: साताऱ्यात कोरोनाचा उद्रेक; 'आरोग्य'वर मृत्यूदर कमी करण्याचे 'टार्गेट'

(कै.) भाऊसाहेब महाराजांना १९७८ पासून सातार्‍यातील जनतेने भरभरुन प्रेम आणि साथ दिली. त्यांच्या पश्‍चात सातारकर आणि सातारा- जावली तालुक्यातील जनतेने माझ्यावर आणि माझ्या कुटूंबावर वडीलकीचे छत्र धरुन कायम पुत्रवत प्रेम आणि आपुलकीची साथ दिली आहे. ज्या छत्रपतींच्या घराण्यात आम्ही जन्माला आलो, ज्या घराण्याचे वंशज म्हणून आम्हाला ओळखले जाते, त्याच घराण्याचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न नेहमी करत आलो आहे. ज्या जनतेने आजवर आमच्या कुटूंबाला भरभरुन दिले त्या जनतेसाठी कोरोना महामारीच्या गंभीर आणि कठीण परिस्थितीत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याच उद्देशाने, कोरोना रुग्णांना उपचाराची सुविधा मिळावी म्हणून हे सेंटर पुन्हा सुरु करत असल्याचे शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले.

कंचनजंगा'वर खरंच लोक गायब होतात?

वास्तविक या सेंटरमध्ये ८० बेड असून त्यापैकी ३२ बेड हे ऑक्सिजनच्या सुविधेसह उपलब्ध होणार आहेत. गतवर्षी हे सेंटर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आले होते मात्र वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध न झाल्याने खाजगी हॉस्पिटलकडे चालवण्यासाठी देण्यात आले होते. यावेळी हे सेंटर डॉ. ऋतुराज देशमुख, डॉ. विक्रांत देशमुख यांच्या श्वास हॉस्पिटलकडे विनामोबदला चालवण्यासाठी देण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात हे सेंटर प्रत्यक्ष सुरु होणार असून कमीत कमी खर्चात रुग्णसेवा देण्याच्या सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे आणि सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी श्वास हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला केल्या आहेत.

यल्या थांब, पळू नको'; महिला पोलिसाच्या मोबाईलवरच चोरट्याचा डल्ला

स्वतःचा जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्या कामगारांना मदत द्या : नरेंद्र पाटील