esakal | महाबळेश्‍वरात पर्यटकांसह हॉटेलला 55 हजार रुपयांचा दंड

बोलून बातमी शोधा

Mahableshwar
महाबळेश्‍वरात पर्यटकांसह हॉटेलला 55 हजार रुपयांचा दंड
sakal_logo
By
अभिजीत खूरासणे

महाबळेश्वर (जि. सातारा) : जिल्हाबंदी आदेश झुगारून सहलीसाठी येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणाऱ्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून 55 हजारांचा दंड वसूल केला. पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केलेल्या कारवाईचे शहरातून कौतुक केले जात आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात लॉकडाउन जाहीर केला आहे. सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्‍यक कामासाठीच जिल्हा ओलांडण्याची मुभा दिली जात आहे; परंतु सहलीसाठी जिल्हा बंदी मोडणे मुंबईतील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. मुंबईच्या पर्यटकांनी लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर महाबळेश्वरच्या सहलीचा बेत आखला. त्यांनी यासाठी महाबळेश्वर येथील हॉटेल ली मेरिडियनमधील रूम ऑनलाइन बुक केल्या. ठरल्याप्रमाणे पर्यटक शुक्रवारी अनेक जिल्ह्याच्या सीमा ओलांडून महाबळेश्वरात दाखल झाले. सायंकाळी पर्यटक येथील नाक्‍यावर आले असता त्यांनी हॉटेल बुकिंग असल्याचे सांगून शहरात प्रवेश केला.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील आता तुम्हीच प्रशासनाचा इलाज करा!

ही माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी पाटील यांना मिळाली. त्यांनी तातडीने पर्यटकांच्या शोधासाठी पथक रवाना केले. या विशेष पथकाने पर्यटकांची एक गाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पकडली. तर इतर दोन गाड्या हॉटेलच्या प्रवेशद्वारावर पकडल्या. अधिक चौकशी केली असता पर्यटकांनी जिल्हा बंदी आदेश मोडल्याचे पथकातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत मुख्याधिकारी पाटील यांना सर्व हकिकत सांगितली.

काय सांगता! फोटोग्राफरच्या बंगल्यात राहतात Canon, Nikon, Epson; वाचा 'क्लिक'ची भन्नाट स्टोरी

मुख्याधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार विशेष पथकाने पर्यटकांच्या प्रत्येक वाहनास दहा हजार, तर या पर्यटकांना हॉटेलमध्ये प्रवेश दिल्याबद्दल हॉटेल व्यवस्थापनास 25 हजार रुपये दंड आकारला. या कारवाईत विशेष पथकाने एकूण 55 हजारांचा दंड वसूल केला.

बेड पाहिजे, इंजेक्शन हवयं! भाजपच्या कार्यकर्त्यांना फाेन करा