esakal | कोरेगावला स्टॅंडर्ड सिटी बनवण्याचे स्वप्न; आमदार शिंदेंकडून पाठपुरावा
sakal

बोलून बातमी शोधा

 city

शहरातील श्रीश्री नगरमध्ये रस्त्यावाचून नागरिकांचे होणारे हाल लक्षात आल्यानंतर आमदार शिंदे यांनी तत्काळ या रस्त्याचे काम हाती घेतले आहे.

कोरेगावला स्टॅंडर्ड सिटी बनवण्याचे स्वप्न; आमदार शिंदेंकडून पाठपुरावा

sakal_logo
By
राजेंद्र वाघ - सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव (सातारा): कोरेगाव शहराला स्टॅंडर्ड सिटी बनवण्याचे आमदार महेश शिंदे यांचे स्वप्न असून, शहरातील श्रीश्री नगरमध्ये लोकसंख्येचा निकष न लावता केवळ जनसेवा म्हणूनच लाखो रुपये खर्चून ट्रीमिक्स काँक्रिटीकरणाचा रस्ता तयार केला जात असल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्र. बर्गे व माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी दिली.

हेही वाचा: सातारा: जनावरं चारण्‍यास मनाई केल्याने वनमजुरास मारहाण

शहरातील श्रीश्री नगरमध्ये रस्त्यावाचून नागरिकांचे होणारे हाल लक्षात आल्यानंतर आमदार शिंदे यांनी तत्काळ या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. प्रत्यक्षात काम साकारत असल्याने अनेक वर्षांची मागणी काही दिवसांमध्येच पूर्ण होत असल्याने या परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. पोकळ आश्वासने न देता प्रत्यक्षात पाहणी करून आणि नागरिकांना विश्वासात घेत त्यांच्या म्हणण्यानुसार दर्जेदार रस्त्याचे काम त्वरित सुरू केले आहे. या परिसरात संपूर्ण काळी माती असल्याने तंत्रज्ञानाचा वापर करून व जमिनीपासून उंची जास्त ठेवून रस्ता तयार केला जात असल्याने रस्ता खचणार नाही आणि पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही.

हेही वाचा: सातारा: दक्षिण भागातील सांगवी-मेढा मार्गावरील रस्ता खचला

संपूर्ण शहराचा रोडमॅप आमदार महेश शिंदे यांच्यासमोर असून, मोठ्या शहरांच्या धर्तीवर कोरेगावच्या विकासासाठी ते प्रयत्नशील आहेत. सर्व १७ प्रभागांमध्ये ठोस आणि दर्जेदार विकासकामे प्रस्तावित असून, त्यापैकी काही सुरू असल्याचे, तर काही सुरू होणार असल्याचे राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञान वापरून भुयारी गटार योजना आणि ट्रीमिक्स काँक्रिटीकरणाचे रस्ते तयार केले जात असून, जनता हीच क्वालिटी कंट्रोलर म्हणून काम करत असल्याने शहरात कोठेही कामादरम्यान अडचणी निर्माण झाल्या नाहीत. दर्जेदार काम होत असल्याने नागरिक समाधानी असल्याचे राहुल प्र. बर्गे यांनी सांगितले.

हेही वाचा: सातारा : दक्षिण तांबवेत सात वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

श्रीश्री नगर परिसरात आमदार शिंदे आले, या ठिकाणी रस्त्याची गरज असल्याचे त्यांनी जाणले आणि तत्काळ काम सुरू झाले. हे फक्त कोरेगाव मतदारसंघातच पाहावयास मिळत असून, महेश शिंदे हे विकासपुरुष आहेत.

- राजाभाऊ बर्गे, माजी नगराध्यक्ष, कोरेगाव

loading image
go to top