esakal | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळातील, उपेक्षितांसाठी काम करतो: शिंदे
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळातील, उपेक्षितांसाठी काम करतो: शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळातील, उपेक्षितांसाठी काम करतो. जावळीतील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आमदार शिंदे प्रयत्न करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळातील, उपेक्षितांसाठी काम करतो: शिंदे

sakal_logo
By
संदीप गाडवे

केळघर (सातारा): आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील अनेक विकासकामे मार्गी लागलेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळातील, उपेक्षितांसाठी काम करतो. जावळीतील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आमदार शिंदे प्रयत्न करत आहेत. या भूमिपुत्रावर तालुक्याने असाच विश्वास ठेवावा. विकासकामे निश्चित मार्गी लावली जातील, अशी ग्वाही माथाडी युनियनचे संयुक्त सरचिटणीस ऋषिकांत शिंदे यांनी दिली.

हेही वाचा: केळघर घाटात पर्यटकास बिबट्याचे दर्शन; पसरणी घाट रस्ता आज बंद

आमदार शिंदे यांच्या माध्यमातून केळघर परिसरात जनसंवाद यात्रेचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आतिष कदम यांनी केले होते. या वेळी केळघर येथे या जनसंवाद यात्रेच्या प्रारंभीवेळी ते बोलत होते. या वेळी माजी सभापती मोहनराव शिंदे, बाजीराव धनावडे, संकेत पाटील, संतोष कदम, सचिन बैलकर, विलास शिर्के, सुरेश कासुर्डे, शांताराम कासुर्डे, भरत कासुर्डे, अंकुश कासुर्डे, समीर डांगे, सुनील दिवडे, मोहन भणगे, बाळू जाधव, श्रीरंग सुर्वे, बाबूराव सुर्वे, डांगरेघरच्या सरपंच कोमल आंग्रे, जगन्नाथ पार्टे, साहेबराव शेलार यांची उपस्थिती होती.

हेही वाचा: केळघर घाटातील फेसाळणा-या धबधब्यांची लुटा मजा

ऋषिकांत शिंदे म्हणाले, "केळघर परिसरात कृषी पर्यटनास चांगला वाव असून, तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा. युवकांना शाश्वत रोजगार उपलब्ध होण्यासाठी आमदार शिंदे यांच्या माध्यमातून काम करू. तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताकद देऊन त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादीची भक्कम साथ निर्माण करू. ज्या गावात विकासकामे आवश्यक आहेत. त्या गावात विकासकामे मार्गी लावली जातील.

हेही वाचा: केळघर, पाटणात मेघगर्जनेसह दमदार पाऊस; वादळात उडाले घरांचे पत्रे

यापुढेही राष्ट्रवादीच्या माध्यमातून आश्वासक विकासकामे पूर्ण करून जनतेला दिलासा देण्यासाठी प्रयत्न करू." मोहनराव शिंदे यांनी तालुक्यात राष्ट्रवादीला मानणारे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याने आमदार शिंदे यांनी या कार्यकर्त्यांना ताकद द्यावी, असे आवाहन केले. या वेळी केळघर येथील बाजारपेठेत जनसंवाद यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. श्री. शिंदे यांनी या वेळी वरोशी, वाटंबे, डांगरेघर येथील ग्रामस्थांशी संवाद साधून विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. या जनसंवाद यात्रेला परिसरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

loading image
go to top