Video : सुप्रिया सुळेंना दिसलं, पाेलिसांनाही दिसलं; पण यांना का नाही?

बाळकृष्ण मधाळे
Friday, 14 August 2020

हे खड्डे बुजविण्याकरिता किंवा डागडुजी करण्यासाठी निधी नसल्याचे कारण पुढे करुन रस्ता दुरूस्तीकडे वारंवार दुर्लक्ष हाेते हे यापुर्वीची उदाहरण आपल्या सर्वांपुढे आहे. गेल्या चार दिवसांपासून पुणे बंगळूर महामार्गावरील शेंद्र ते कागल या रस्त्यावरील खिंडवाडी येथे कमी जास्त प्रमाणात कोंडी होत आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते आणि महामार्गावर सातत्याने पाणी साचल्यामुळे खड्डे पडले आहेत. खड्ड्यामुळे वाहतूक खोळंबा होत असून तो टाळण्यासाठी वाहतूक पोलिस कर्मचारी महामार्गावर तैनात आहेत. दरम्यान, कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून व्यापक प्रयत्न केले जात आहेत. रस्त्यांची ही अवस्था पाहता, सातारा पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनी थेट पुणे- बंगळूर महामार्गावरील खड्डे बुजवले आहेत, त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत असले तरी जे खासदार सुप्रिया सुळेंना दिसले, पाेलिसांनाही दिसले परंतु महामार्ग प्राधिकरणास (एनएचएआय) का नाही? असा सवाल या निमित्ताने उपस्थित हाेत आहे.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा

गेल्या काही वर्षांपासून पुणे- बंगळूर महामार्गावरील एकेक रस्ता चर्चेचा विषय ठरला आहे. कधी सामाजिक कार्यकर्ते, कधी लाेकप्रतिनिधी तर कधी नेटीझन्स यांच्या माध्यमातून या महामार्गावरच्या रस्त्याबाबत आंदाेलन छेडण्यात आले. त्यानंतर ताेंडाला पाने पुसताे तसे महामार्ग प्राधिकरण रस्त्याची डागडूजी करीत असते. आता पुन्हा एनएच फाेरचा रस्ता हा चर्चेचा विषय हाेऊ लागला आहे. अहाे... निमित्त बनले आहे पुन्हा तेच...खड्डे.

जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे.., वाचा 'तिच्या' विषयी  

हे खड्डे बुजविण्याकरिता किंवा डागडुजी करण्यासाठी निधी नसल्याचे कारण पुढे करुन रस्ता दुरूस्तीकडे वारंवार दुर्लक्ष हाेते हे यापुर्वीची उदाहरण आपल्या सर्वांपुढे आहे. गेल्या चार दिवसांपासून पुणे बंगळूर महामार्गावरील शेंद्र ते कागल या रस्त्यावरील खिंडवाडी येथे कमी जास्त प्रमाणात कोंडी होत आहे. गुरुवारी (ता.13) या मार्गावरील वाहतूककोंडी कमालीची वाढल्याचे वाहन चालकांकडून सांगण्यात आले. या रस्ता बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आल्याने अल्पावधीतच या रस्त्याचे बारा वाजले आहेत.

अकरावी प्रवेश वेळापत्रकामध्ये बदल,  आता या तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

पुणे-बंगळूर रस्त्यावर पुण्यापासून ते सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या मार्गावरुन वाहने चालवितांना वाहनधारकांची तारेवरची कसरत हाेत आहे. यामार्गे नोकरी करणारे, व्यावसायिक, मजूर, शेतकरी, विद्यार्थी येथून ये-जा करतात. त्यांना सुध्दा माेठा त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपुर्वी खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विटरच्या माध्यमातून पुणे बंगळूर महामार्गावरील रस्त्याच्या अवस्थेबद्दल एनएचएआयवर ताेफ डागली. वारंवार या रस्त्याच्या दूरावस्थेबद्दल आम्ही पाठपुरावा करीत आहाेत परंतु काहीच सुधारणा झालेली नाही अशी टिपणीही सुळे यांनी केली आहे. 

आपत्कालीन परिस्थितीत धावला वाईतील जैन समाज 

Despite Regular follow up with @NHAI_Official about the Repair Works of Pune - Satara Highway nothing has been done. With Potholes on along with Monsoon travelling on this road has become extremely difficult
Requesting Hon.@nitin_gadkari Ji to kindly look into matter@OfficeOfNG

— Supriya Sule (@supriya_sule) August 6, 2020

/>

पाेलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या सातारा जिल्ह्यात कार्यरत झाल्यापासून पाेलिस दलातील माणूसकीचे रुप पावलाे पावली पाहण्यास मिळत आहे. काेराेनाच्या काळातील जबाबदारी पेलत पाेलिस कर्मचारी काेणत्याही घटकांत अहाेरात्र झटत आहेत हे आपण पाहतच आहाेत. याचीच प्रचिती आज (शुक्रवार) पुणे-बंगळूर महामार्गावरील खिंडवाडी ते शेंद्रे या रस्त्यावरील खड्डे बुजविणारे मावळ्यांच्या माध्यमातून पुढे आली. सातारा पाेलिस दलातील मनोज जाधव व किरण
चिकणे या दाेघांनी हातात खाेरे आणि पाटीच्या माध्यमातून तब्बल 20 ते 25 खड्डे बुजविले. 

ह्या महामंडळाने उद्योजकांना केले 74 कोटींचे अर्थसाह्य

पाेलिसांचे हे कृत्य पाहून उद्याेजक सागर भाेसले यांनी घटनास्थळाचे चित्रण केले. त्यांनी पाेलिसांना भेटून त्यांचे काैतुक केले. आता तरी लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी ठाेस पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Supriya Sule And Satara Police Worried Potholes On Pune Satara National Highway