

Nana Patekar Helped Farmers Through Water Conservation and Drip Irrigation as Balasaheb Shinde Recalls His Kindness and Support
sakal
-राजेंद्र शिंदे
खटाव : दुष्काळाने होरपळलेल्या गावांच्या मातीला ओलावा देताना माणसांच्या आयुष्यातही मायेचा झरा निर्माण करणारे नाना पाटेकर आज आठवणींच्या रूपाने मनात उरले आहेत. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाला बळ देणाऱ्या नानांनी केवळ पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हातभार लावला नाही, तर ग्रामीण भागातील प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या कष्टाची दखल घेत त्यांना काम करण्याची संधीही दिली.