Satara Lok Sabha: उदयनराजेंना धक्का? नरेंद्र पाटील यांची सातारा लोकसभा लढण्याची इच्छा

Satara Lok Sabha: महायुतीची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी खासदार उदयनराजे भोसले, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, पुरुषोत्तम जाधव अन्य काही जणांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
Satara Lok Sabha
Satara Lok Sabhaesakal

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सध्या महायुतीकडुन इच्छुक असणाऱ्या कोणालाही अद्यापही ग्रीन सिग्नल देण्यात आलेला नाही. महायुतीची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी खासदार उदयनराजे भोसले, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, पुरुषोत्तम जाधव अन्य काही जणांनी प्रयत्न सुरु केले आहेत. असे असताना महायुतीच्या कऱ्हाडमधील मेळाव्यात नरेंद्र पाटील यांनी थेट खासदार उदयनराजे भोसले यांच्या समोरच सातारा लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त करुन आमचे दिल्लीत कोणीही नाही मात्र आम्ही मुंबईत सागर बंगल्यावर जातो अशी टिप्पणी करुन उपस्थितांचे लक्ष वेधले.

सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवारीचे व्टिस्ट अजुनही सुटलेले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांनी ज्यांचा सिटींग खासदार त्यांचीच ती जागा हे सुत्र मांडले आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदार संघाची जागा ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला मिळणार की तेथे भाजपकडुन खासदार उदयनराजे भोसले हे उभे राहणार याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरु आहेत. त्यातच खासदार भोसले यांनी उमेदवारीसाठी जोरदार लॉबींग करुन सातारा जिल्ह्यात भेटीगाठीवर भर दिला आहे.

Satara Lok Sabha
Crime News: पुण्यातील 22 वर्षांच्या विद्यार्थिनीचा करून अंत, 9 दिवसांनी अहमदनगर मध्ये आढळला मृतदेह

त्यामुळे त्यांनी वातावरण निर्मीतीही सुरु केली आहे. त्यापार्श्वभुमीवर सातारा लोकसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीतील घटक पक्षांच्या कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या संवाद मेळावा घेण्यात आला.

Satara Lok Sabha
Sanjay Raut: "संजय राऊतच खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार," निरुपम यांचे खळबळजनक आरोप

त्या मेळाव्यात नरेंद्र पाटील यांनी या निवडणुकीसाठी मलाही संधी मिळणार आहे. मी अजुनही महाराज साहेब अपेक्षीत असल्याचे व्यासपिठावर मी जाहीरपणे सांगतो. आमचे दिल्लीला कोणीच नाही. तुम्ही दहा वर्षे लोकसभेचे नेतृत्व केले आहे. राज्यसभेचेही तुम्ही नेतृत्व करत आहात. तुमही जसे दिल्लीला गेलात तसे आमचे मात्र दिल्ली कोणीही नाही. आम्ही सागर बंगला आणि भाजपचे मुंबईचे कार्यालय यांच्याच संपर्कात आहोत. मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ दिला. त्याव्दारे आपले सहकारी उपस्थित होते. त्यांनी काय सांगीतले मला माहित नाही, मात्र मी त्यांना आपण जो निर्णय घ्याल तो नरेंद्र पाटील म्हणुन भाजपचा कार्यकर्ता आणि माथाडी कामगार म्हणुन अंतिम राहिल हे आवर्जुन सांगतो.

Satara Lok Sabha
Ajit Pawar: पार्थ पवारांचा दारुण पराभव करणाऱ्या बारणेंच्या प्रचाराला अजित पवार!

नरेंद्र पाटील विरुध्द महाराज वातावरण करण्याचा प्रयत्न

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण जो निर्णय घ्याल तो निर्णय माथाडी कामगार म्हणुन अंतीम राहिल अशी भुमिका मी घेतली असे सांगुण नरेंद्र पाटील म्हणाले, २०१९ च्या दरम्यानचे काही फोटो, व्हीडीओ काटछाट करुन काही जणांनी सोशल मिडीटावर टाकले आहेत. त्याव्दारे नरेंद्र पाटील विरुध्द महाराज असे वातावरण निर्माण करण्याचे काम केले आहे. महाराज जिथे उभे आहेत तिथे सर्वच आडवे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. मी तुमच्या बाजुने राहणार आहे. मात्र अंतिम निर्णय मला अपेक्षीत आहे असेही ते म्हणाले.

Satara Lok Sabha
Sangli Loksabha: सांगलीत मविआचा उमेदवार सेनेचा असणार की काँग्रेसचा? उद्या होणार फैसला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com