

“Minister Makrand Patil addressing NCP workers’ meeting in Wai; confirms party will contest civic elections on ‘Clock’ symbol.”
Sakal
वाई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या मित्रपक्षांनी अस्तित्वासाठी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला असून, त्यामुळे राष्ट्रवादीनेही ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार असल्याने कार्यकर्त्यांनी त्यादृष्टीने कामाला लागावे, असे आवाहन मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी केले.