esakal | राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब भिलारे यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब भिलारे यांचे निधन

जिल्ह्याच्या राजकारनात बाळासाहेब भिलारे यांचे मोलाचे योगदान असल्याने जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी दादांना आदरांजली वाहिली.

राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब भिलारे यांचे निधन

sakal_logo
By
महेश बारटक्के, रविकांत बेलोशे

कुडाळ (सातारा): महाबळेश्वर तालुक्याचे जेष्ठ नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, स्ट्रॉबेरी ग्रोवर्स असोसिएशनचे दिल्लीचे अध्यक्ष व पुस्तकांच्या गावचं एक सक्षम नेतृत्व महाबळेश्वर तालुक्याचा देव माणूस म्हणून परिचित असणारे प्रल्हाद उर्फ बाळासाहेब भिलारे उर्फ दादा यांचे आज 72 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. अंत्यविधी आज सायंकाळी 5 वाजता भिलार या गावी होणार आहे

हेही वाचा: कुडाळ - आमदार वैभव नाईक यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल

गेले दीड ते दोन महिन्यापासून बाळासाहेब भिलारे हे अल्प आजाराने दवाखान्यात उपचार घेत होते. काही दिवसापूर्वी त्यांना बरे वाटत असल्याने त्यांना घरी आणण्यात आले होते, परंतु रात्री अचानक तब्येत बिघडल्याने दादांना दवाखान्यात दाखल केले होते, परंतु आज त्यांची प्राणज्योत माळवली असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

हेही वाचा: प्रवाशांमध्ये खळबळ: कुडाळ रेल्वे स्थानकावर दोघे पॉझिटीव्ह

प्रल्हाद उर्फ बाळासाहेब भिलारे (दादा ) महाबळेश्वरच्या राजकारणातला एक दृष्टा नेता होते. सदैव जनतेच्या तनामानात असलेला, जनतेच्या हितासाठी कायम झटणारा, जनतेची आस्मिता जागवणारा नेता म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते.

हेही वाचा: कुडाळ ते कर्ली "एसपीं'चा एसटी प्रवास

तळागाळात विकासाची गंगा पोहोचवून त्या लोकांचे आशीर्वाद नेहमी पाठीशी ठेवणारे ‘लोकनेते म्हणून त्यांचा परिचय होता‘ स्वतः आमदार झालो नाही तरी इतरांना त्या पदापर्यंत पोहोचवणारी ताकद निर्माण करणारे म्हणून ज्यांचा उल्लेख करावा लागेल, असा नेता महाबळेश्वर तालुक्याला लाभला. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय मा. बाळासाहेब भिलारे (दादा) यांच आज निधन झाल्याची बातमी महाबळेश्वर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पसरली आणि अनेकांना शोक अनावर झाला, जिल्ह्याच्या राजकारनात बाळासाहेब भिलारे यांचे मोलाचे योगदान असल्याने जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी दादांना आदरांजली वाहिली.

loading image
go to top