कऱ्हाडला जोडणारे मार्ग बनले धोक्याचे; वर्षभरात 65 जणांनी गमावला जीव, पुणे-बंगळूर महामार्गावर सर्वाधिक मृत्यू

पुणे- बंगळूर महामार्गावर सर्वाधिक अपघात झाले आहेत.
Pune-Bangalore National Highway Road Accident
Pune-Bangalore National Highway Road Accidentesakal
Summary

स्थानिक पोलिस, महामार्ग पोलिस, आरटीओ वेगवान वाहनांवर दंडात्मक कारवाई करत आहे.

कऱ्हाड : शहरातून जाणाऱ्या पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गासह (Pune-Bangalore National Highway) शहराला जोडणाऱ्या अन्य मार्गावर होणाऱ्या अपघातांची (Road Accident) संख्या वर्षभरात वाढली आहे. वर्षभरात २०० अपघात झाल्याची नोंद आहे. त्यात ६५ जणांनी जीव गमावला आहे. ६०० हून अधिक जणांना कायमाची दुखापत झाली आहे.

पुणे- बंगळूर महामार्गावर सर्वाधिक अपघात झाले आहेत. तेथील वेगवान वाहनांमुळे अपघात होत आहेत. ते रोखण्यासाठी पोलिसांनी महामार्गावर वेगवान वाहनांवर कारवाई करूनही वाहनांचा वेग कमी होताना दिसत नाही. परिणामी कमी अपघातात मृतांची संख्या जास्त झाली.

Pune-Bangalore National Highway Road Accident
Loksabha Election : ठरलं! सदाभाऊ आता थेट जुन्या भिडूलाच भिडणार; लोकसभेसाठी 'या' मतदारसंघातून आजमावणार ताकद

स्थानिक पोलिस, महामार्ग पोलिस, आरटीओ वेगवान वाहनांवर दंडात्मक कारवाई करत आहे. त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. वर्षात तब्बल २० हजारहून अधिक वेगवान वाहनांवर कारवाई झाली आहे, तरीही वेगावर आवर आलेला नाही.

वेगाला हवा आवर...

मोठ्या शहरातील आलिशान वाहनांचा वेग कमी झालेला नाही. त्यामुळे अपघातातील मृतांची संख्या जास्त आहे. वर्षभरात तीच अपघातांची संख्या २०० झाली आहे. वेगवान वाहनांमुळे झालेल्या अपघाताची संख्या २२ आहे. त्यात ३१ जणांनी जीव गमावला आहे. वेग कमी व्हावा, यासाठी महामार्ग पोलिसांनी उपाययोजना करत आहेत. मात्र, त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.

Pune-Bangalore National Highway Road Accident
पुणे-बंगळूर महामार्गावरुन प्रवास करत असाल, तर थांबा! सरकारला इशारा देत शेट्टींचं आज महामार्गावर 'चक्का जाम'

कऱ्हाडला जोडणारे मार्ग

  1. कऱ्हाड - सातारा

  2. कऱ्हाड - कोल्हापूर

  3. कऱ्हाड - तासगाव

  4. कऱ्हाड - विटा

  5. कऱ्हाड - दहिवडी

  6. कऱ्हाड - पाटण

असे आहेत उपाय

  • महत्त्वाच्या मार्गावर स्पीडगनद्वारे दंडात्मक कारवाई करावी

  • रहदारीच्या गावांत गतिरोधक बसवावेत

  • गावानजीक रंबलर बसवावेत

  • वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून वाहनाच्या वेगाची तपासणी करावी

Pune-Bangalore National Highway Road Accident
Bus Accident : गोवा सहलीसाठी 21 प्रवासी घेऊन जाणाऱ्या मिनी बसला अपघात; तिघेजण गंभीर, 15 प्रवासी जखमी

अशी आहेत कारणे

  1. वाहनांच्या वेगाची मर्यादा ताशी १५० किलोमीटरहून अधिक

  2. पोलिसांच्या कारवाईलाही न जुमानता वाढणारा वाहनांची वेग

  3. महामार्गावर काम सुरू असल्याने पर्यायी मार्ग लक्षात न आल्याने होणारे अपघात

  4. रात्री होणाऱ्या अपघातातही अमर्याद वेगाने घात

  5. पावसाळ्यात दुरवस्था झालेले महामार्ग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com