राष्ट्रवादीसह शिवसेनेतील काहीजण आमच्या संपर्कात; शिंदे गटाच्या नव्या जिल्हा प्रमुखांचं मोठं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Purushottam Jadhav

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी आपल्यावर दिलीय.'

राष्ट्रवादीसह शिवसेनेतील काहीजण आमच्या संपर्कात; शिंदे गटाच्या नव्या जिल्हा प्रमुखांचं मोठं विधान

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सातारच्या जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी आपल्यावर दिलीय. त्यामुळं पुन्हा एकदा नव्या दमानं कामाला सुरवात करून शिवसेनेचे (Shiv Sena) संघटन वाढविण्यास प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यात शिंदे गट शिवसेना व भाजप युतीच्या माध्यमातून जिल्ह्यावर आगामी निवडणुकीत भगवा फडकविणार आहे, असं स्पष्ट मत शिंदे गटाचे नूतन जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम जाधव (Purushottam Jadhav) यांनी आज साताऱ्यात व्यक्त केलं.

शिंदे गट शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जाधव यांनी आज शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिंदे गट शिवसेनेच्या सातारा जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मी घेतलीय. उद्या शिवसेनेच्या होणाऱ्या मेळाव्यात उर्वरित पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या करणार आहे. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा: भाजपच्या संसदीय मंडळातून गडकरींना हटवलं; स्वामी म्हणाले, आता मोदींच्या इच्छेनं..

चंद्रकांत जाधव यांची जिल्हा प्रमुख होण्याची इच्छा होती, पण..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माझ्यावर नव्यानं जबाबदारी दिलीय. जिल्हा प्रमुख म्हणून मला दुसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळाली आहे. शिंदे गटातील काहीजण नाराज आहेत का, याविषयी ते म्हणाले, माझ्याकडं वाई, खंडाळा, महाबळेश्वर, जावळी, सातारा व कोरेगाव तालुक्यांची जबाबदारी आहे. तसेच आमच्यात कोणीही नाराज नाही. नव्यानं पदाधिकारी नेमणार असून ते जिल्ह्यात संघटनेचे काम पुढाकार घेऊन करतील, असंही त्यांनी व्यक्त केलं. चंद्रकांत जाधव यांची ही जिल्हा प्रमुख होण्याची इच्छा होती. पण, त्यांच्यावर जिल्हा संघटक पदाची जबाबदारी दिलीय. तसंच शरद कणसे यांच्यावर जिल्हा संपर्क प्रमुख जबाबदारी दिली आहे. जिल्ह्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असून मी नुकतीच उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. एमआयडीसीतील भूमिपुत्रांचे प्रश्न सोडविण्यासह जिल्हयात नवे उद्योग आणण्यावर आमचा भर राहणार आहे.

हेही वाचा: उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; शिवसेनेचा 'हा' आमदार शिंदे गटाच्या वाटेवर?

'राष्ट्रवादीसह शिवसेनेतील काहीजण आमच्या संपर्कात'

आगामी निवडणुकीसाठी शिंदे गट शिवसेना व भाजप (BJP) युतीच्या माध्यमातून लढणार असून शिवसेनेची मूळ संघटना आमच्यासोबत आहे. यापुढं आम्ही ताकतीनं पुढं जाणार आहे. जिल्ह्यातीलच मुखमंत्री असल्यानं जास्तीत-जास्त निधी आणला जाणार आहे. राष्ट्रवादीसह (NCP) शिवसेनेतील काहीजण आमच्या संपर्कात असून आम्ही त्यांचं स्वागतच करणार आहोत. खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) हे आमच्या युतीच्या पक्षाचे खासदार आहेत. त्यामुळं आमच्यात कोणताही वादविवाद नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Web Title: Purushottam Jadhav Was Elected As The District Head Of The Shinde Group

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..