
सातारा : किसन वीर कारखाना सुरू होणार नाही - सहकारमंत्री पाटील
भुईंज : किसन वीर साखर कारखान्याने गेल्या हंगामात उचललेली थकहमीची रक्कम अद्याप पुर्ण भरलेली नाही. काही बाबी न्यायप्रविष्ठ असल्यामुळे शासनाकडून आर्थिक मदत मिळू शकत नाही. परिणामी हा कारखाना सुरु होऊ शकत नाही, असे प्रतिपादन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. जांब (ता. वाई) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा: निवडणुकीत शिवसेनेकडून राष्ट्रवादीचा 'करेक्ट कार्यक्रम'
त्याप्रसंगी पाटील बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील, राष्ट्रवादी आयटी सेलचे अध्य़क्ष सारंग पाटील, सभापती संगिता चव्हाण, उपसभापती भैय्या डोंगरे, मनिषा गाढवे, मनिषा शिंदे, शशिकांत पवार,सचिन पवार, सुधाकर गायकवाड, नितेश डेरे, तहसिलदार रणजित भोसले, प्रमोद शिंदे आदी उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले,‘‘सहकार कायद्यातून पाहिल्यास चुकीचे काम करणा-या व स्वतःही पुढे जायचे नाही व दुस-यालाही पुढे जाऊ द्यायचे नाही,अशी प्रवृत्ती या ठिकाणी दिसून येत आहे.
हेही वाचा: गाड्यांचा ताफा थांबवून गृहराज्यमंत्री धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला
चुका सापडूनही त्याला न्यायालयातून स्टे आँर्डर मिळविल्याने कारखाना दुस-यालाही चालवयला देता येत नाही. त्यामुळे किसन वीर कारखान्याचा हंगाम चालू शकत नाही. किसन वीर आबांनी या परीसरातील शेतक-यांचे जीवन सुधारावे, त्यांच्या पिकाला स्थानिक बाजारपेठ निर्माण व्हावी, म्हणून हे सहकाराचे मंदीर उभे केले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे परीवर्तन झाले. पण, आत्ता दुर्दैवाने हे मंदीर आज बंद आहे. गेल्यावर्षी ३२ कारखान्यांना थकहमी देण्यात आली होती. त्यात किसन वीर कारखाना व खंडाळा कारखाना होता. या दोन्ही कारखान्यांना आर्थिक सहकार्य केले. दोन्ही कारखान्यांची रक्कम उचलली गेली. दुर्दैवाने खंडाळा तर सुरुच झाला नाही आणि किसन वीरचे गळीत झाले नाही. शासनाने थकहमीच्या माध्यमातून दिलेले पैसेही परत आलेले नाहीत. अडचण फार मोठी आहे. शाश्वत पिक असल्याने ऊसाचे क्षेत्र वाढले आहे.
हेही वाचा: वाठार, बेलवडे, आणे सोसायटीवर भाजपच्या भोसलेंचं वर्चस्व
वाढलेल्या ऊसाचे काय करायचे हे वाईसह तर तालुक्यातून सातत्याने विचारणा होत आहे.त्यासाठी साखर आयुक्तांना सांगितले आहे की आत्ता जे कारखाने सुरु आहेत. त्या कारखान्यांनी शासनाची परवानगी घेतल्याशिवाय कारखाने बंद करु नयेत. त्या परीसरातील संपुर्ण ऊस संपवायचे बंधन आपण घातले आहे.’’ मकरंद पाटील म्हणाले,‘‘ कारखाना सत्तांतरपुर्वी जिल्हा बँकेने व राज्य बँकेने पैसे दिले नाहीत. दुर्दैवाने दिवाळीत सभासदांना टनामागे ५० रुपये देवु शकलो नाही. म्हणून आपला कारखाना हातामधून गेला. ५० कोटी भागभांडवल गोळा केले तरी हा कारखाना सुरु होत नाही.’’ प्रारंभी जांबच्या ७५ जेष्ठांचा सन्मान सहकारमंत्री पाटील व मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
Web Title: Satara Kisan Veer Factory Not Start Co Operation Minister Pati
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..