esakal | सामाजिक कार्यकर्त्या काेमल पवार यांचे निधन, युवा वर्गात हळहळ
sakal

बोलून बातमी शोधा

सामाजिक कार्यकर्त्या काेमल पवार यांचे निधन, युवा वर्गात हळहळ

काेमल आणि धीरज हे आपल्या फाउंडेशनमार्फत अवयवदानाचे महत्त्व पटविण्यासाठी जागृती करीत राहिले. काेमल यांनी गरजू रुग्णांना मदत देखील केली हाेती.

सामाजिक कार्यकर्त्या काेमल पवार यांचे निधन, युवा वर्गात हळहळ

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : कोमल न्यू लाइफ फाउंडेशनच्या संस्थापिका सामाजिक कार्यकर्त्या काेमल धीरज गाेडसे (पवार) यांचे निधन झाले. दोन दिवसांपूर्वी त्या उपचारासाठी हैदराबाद येथे गेल्या होत्या अशी माहिती नातेवाईकांनी दिली. दरम्यान त्यांच्या निधनाची बातमी समजताच सातारा शहरातील युवा वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
जिवाची पर्वा न करणारा कऱ्हाडचा 'गणेश' ठरला त्यांच्यासाठी विघ्नहर्ता

सुमारे तीन वर्षांपर्वी काेमल यांचे ह्रदय आणि फुफ्फुसाचे प्रत्यारोपण झाल्यानंतर त्या पूर्ववत जगण्याचा आनंद घेऊ लागल्या हाेत्या. केवळ अवयवदानामुळे पुनर्जन्म लाभल्याची जाणीव त्यांच्या मनात हाेती, म्हणूनच पुन्हा अशी वेळ कुणावर येऊ नये व आली तर मदत व्हावी, या हेतूने त्यांनी साताऱ्यात कोमल न्यू लाइफ फाउंडेशनची स्थापना केली हाेती. 

हेही वाचा -  अवयवदानामुळेच कोमलला पुनर्जन्म!

शरीरातील एकेका अवयवांचे कार्य वेगळे जगण्याचा आनंद देणारे असते. अवयवाचे महत्त्व आगळे असते, स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठीही! हेच काेमल यांच्यावरील शस्त्रक्रियेने सिद्ध केले. काेमल आणि धीरज हे आपल्या फाउंडेशनमार्फत अवयवदानाचे महत्त्व पटविण्यासाठी जागृती करीत राहिले. काेमल यांनी गरजू रुग्णांना मदत देखील केली हाेती.

जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे.., वाचा 'तिच्या' विषयी 

कोरोनाची करुण कहाणी; आता कशी करेल, गणराया त्यांचे साकडे पुरे?

सातारा : तब्बल 30 कोटींच्या निधीची विकासकामे रखडणार; दुर्लक्षाचा परिणाम


 

loading image
go to top