esakal | नरफदेव गावावर शाेककळा; रविवार पेठ, मालगावच्या युवकाचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

Accident
नरफदेव गावावर शाेककळा; रविवार पेठ, मालगावच्या युवकाचा मृत्यू
sakal_logo
By
संताेष साबळे, - प्रशांत गुजर

शिवथर (जि. सातारा) : सातारा-लोणंद रस्त्यावर शिवथर येथील इंगवले वस्तीनजीक टेंपो व दुचाकीची समोरासमोर धडक बसून दोन युवकांचा मृत्यू झाला. या अपघातात एक युवक जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टेम्पो व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन मोटारसायकलवरील दोन युवक जागीच ठार झाले. या अपघातात एक जण जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुचाकीवरून तीन युवक प्रवास करीत होते. दुचाकीवरील शंकर क्षीरसागर (वय 25, रा. रविवार पेठ, सातारा) व मालगाव (ता. सातारा) येथील विशाल वाल्मीक कुंभार (वय 40) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असणारा जीवन पवार (वय 32, रा. रविवार पेठ, सातारा) हा अपघातात जखमी झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. अपघातस्थळी सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस. व्ही. देव, पोलिस कॉन्स्टेबल एच. एन. ननावरे, एच. जी. महाले, एस. एस. मोरे यांनी भेट देऊन पंचनामा केला. संबंधित अपघातातील वाहने तालुका पोलिस ठाण्यात जमा केली आहेत.

कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू; मेरुलिंग घाटामध्ये अपघात; तिघे जखमी

सायगाव (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यातील पर्यटनस्थळ श्री क्षेत्र मेरुलिंगच्या घाटामध्ये नरफदेव येथून रेशनिंग आणण्यासाठी निघालेली कार दरीत कोसळून एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले. तिघांच्या मृत्यूने नरफदेव गावावर शोककळा पसरली आहे.

माझे लग्न आहे, मला पळवून न्या.. तुमची पुष्पा, आय लव्ह यू

याबाबत माहिती अशी, की नरफदेव येथील ग्रामस्थ व महिला आज सकाळी साडेसात वाजता रेशनिंग आणण्यासाठी कारमधून (क्रमांक MH 43AL7946) दरे खुर्द येथे निघाले होते. येथील मेरुलिंग घाटामध्ये एका वळणावर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने व कमी रुंदीच्या रस्त्यामुळे कार संरक्षक भिंत नसलेल्या कड्यावरून दीडशे फूट दरीत कोसळली. कार दहा-बारा पलटी खावून वळून येणाऱ्या खालच्या रस्त्यावर पुढील बोनेटवर उभी राहिली होती. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या गाडीमधील काही ग्रामस्थांनी हा अपघात पाहिला. कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. त्यामधून जखमींना बाहेर काढताना लोखंडी पारा आणून कार फोडून त्यातून बाहेर काढावे लागले. त्यावेळी आतील सर्व जण गुदमरले होते.

या अपघातात चालक शिवाजी जगन्नाथ साबळे (वय 40), लीलाबाई गणपत साबळे (वय 55), सागर सर्जेराव साबळे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मेरुलिंग गावचे माजी उपसरपंच वसंत साबळे (वय 55), पांडुरंग साबळे (वय 56), महेश साबळे (वय 19), सचिन साबळे (वय 28), शोभा भिलारे (वय 45) व इतर एक जण किरकोळ जखमी झाले.

मेढा नगराध्यक्षपदी पांडुरंग जवळ; उपनगराध्यक्षपदी कल्पना जवळ

जखमींना सायगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून घरी सोडले. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मेढा येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. या वेळी सभापती जयश्री गिरी यांनी जखमींना धीर दिला. या घटनेची नोंद मेढा पोलिस ठाण्यात झाली असून, सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कदम करत आहेत. तिघांच्या मृत्यूने नरफदेव गावावर शोककळा पसरली आहे.

युवकांचे प्रसंगावधान

अपघातानंतर काही वेळातच गावात ही माहिती कळाल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील प्रसंग पाहिल्यानंतर नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. मोरघर व नरफदेव येथील युवक शशिकांत गायकवाड, नीलेश गायकवाड, सत्यवान डोईफोडे, पांडुरंग हिरवे, सुदाम बादापुरे, सुनील साबळे यांनी प्रसंगावधान राखून जखमी व गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी मोठी मदत केली.

एकीचे बळ! बोंबाळेत गावकऱ्यांनी उभारले विलगीकरण कक्ष

'ग्रामस्थांनाे! कोरोनात तरी राजकारण बाजूला ठेवा'