esakal | Hotspot गावातील युवक जीवाची बाजी लावून करताहेत सेवा

बोलून बातमी शोधा

covide test

Hotspot गावातील युवक जीवाची बाजी लावून करताहेत सेवा

sakal_logo
By
केशव कचरे

बुध (जि. सातारा) : एक दाेन रुग्णांनंतर आता काटेवाडी हे संपुर्ण गावच काेराेनाचे हॉटस्पॉट बनले आहे. या परिस्थितीत देखील येथील युवकांच्या धाडसामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळत आहे. या गावातील दाेन युवक स्वतःची जिवाजी बाजी लावून अनेकांना तपासणीसाठी सातारा शहरात घेऊन येत आहेत. तेथे त्यांची तपासणी झाल्यानंतर पुन्हा काय हवे काय नकाे याची विचारणा करतात. या युवकांमधील घडणारे माणुसकीच्या दर्शनाने ग्रामस्थांच्या डाेळ्यातून आपाेआपच अश्रु येतात.

काटेवाडी (ता. खटाव) गाव सध्या हॉटस्पॉट झोनमध्ये गेले आहे. गेल्या आठ दिवसांत गावातील कोरोना रुग्णांची संख्या 29 वर पोचली असून, दोन रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थ हादरले आहेत. गेल्या आठवड्यात एकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील तब्बल 13 व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्या. त्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा 80 व्यक्तीच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात पुन्हा पाच व्यक्ती बाधित निघाल्या. श्वसनाचा त्रास होणाऱ्या चार रुग्णांना सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल रुग्णासह बाधित रुग्णांची संख्या 29 वर पोचली. गाव प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले.

कोरोनाचा नायनाट करण्यासाठी वडूजात सात दिवसांचा कर्फ्यू

दरम्यान, काल सातारा येथे उपचार घेत असलेला एक व घरी उपचार घेत असलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थ प्रचंड तणावाखाली आहेत. घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांची मानसिक स्थिती ढासळली आहे. त्यांना मानसिक आधाराची खरी गरज असून, गावातील गणेश कचरे, पृथ्वीराज पांडेकर, सरपंच बाळासाहेब जगदाळे, अंगणवाडी सेवीका मनीषा काटकर, आशा जगदाळे, शुभांगी कर्णे रुग्णांना मानसिक आधार देण्याबरोबरच गरजूंना औषधे व गरजेचे साहित्य पुरवून त्यांच्या वेळोवेळी तपासण्या करीत आहेत.

युवकाच्या धाडसाचे कौतुक

गणेश कचरे हा धडपड्या युवक जिवाची बाजी लावून अनेक रुग्णांना एचआरसीटी तपासणीसाठी सातारा येथे नेऊन त्यांच्या तपासण्या करीत आहे. त्याच्या या धाडसाचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे. पृथ्वीराज पांडेकर रुग्णसेवा करत माणुसकीचे दर्शन घडवित आहे.

सातारकरांनाे! इथं मिळेल तुम्हांला ऑक्‍सिजन बेड

युवक काँग्रेसच्या हालचाली; जगताप हॉस्पिटलला काेविडची मान्यता