esakal | बातमी कामाची! घरबसल्या जातीचे प्रमाणपत्र कसे मिळवाल?; जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

आपल्याला शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा शालेय शिक्षण सुरु असताना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.

बातमी कामाची! घरबसल्या जातीचे प्रमाणपत्र कसे मिळवाल?; जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : आपल्याला शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा शालेय शिक्षण सुरु असताना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. हे प्रमाणपत्र महाविद्यालीन विद्यार्थी, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आवश्यक असते. हे प्रमाणपत्र आपल्याकडे नसेल, तर काही वेळा नोकरी गमावण्याची देखील वेळ येऊ शकते, त्यामुळे हे प्रमाणपत्र आपल्याकडे असणे अनिवार्य आहे.

जातीचे प्रमाणपत्र आपल्याकडे असण्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे, या पत्रामुळे शासनाच्या बऱ्याचश्या सुविधांचा आपल्याला लाभ घेता येतो. जातीचे प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होते. तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता. यासाठी प्रशासनाने आपल्याला सुलभ सुविधा उपलब्ध करुन दिली असून शासनाने दिलेल्या संकेतस्थळावर जावून याबाबतची अधिक माहिती तुम्ही मिळवू शकता.  

1583 च्या काळातील आंध्र प्रदेशातील लेपाक्षी मंदिराविषयी माहितीय?; जाणून घ्या रंजक आणि रहस्यमय कहाणी 

जातीचे प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

ओळखीचा पुरावा : पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्र आवश्यक आहे.

पत्ता दर्शवणारा पुरावा : पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बील, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, वीज बील, घरफळा पावती, सातबारा किंवा 8 अ उतारा, यापैकी एक कागदपत्र आवश्यक आहे.

विदेशात नाही तर भारतातच आहे जगातील सर्वात मोठे बेट, वाचा सविस्तर 

जातीचा पुरावा दर्शवणारी आवश्यक कागदपत्रे : 

 • अर्जदार, त्याचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा
   
 • अर्जदार अथवा अर्जदाराच्या वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला
   
 • वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा 
   
 • वडील अथवा जवळच्या नातेवाईकाच्या जात/समाजाचा उल्लेख असणारा शासकीय सेवा नोंदवहीचा उतारा
   
 • अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र
   
 • ग्रामपंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत
   
 • जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावे
   
 • सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य संबंधित कागदोपत्री पुरावे

Video पाहा : द्रविड हायस्कूलच्या पेन्सिलच्या प्रतिकृतीची हाेतेय चर्चा

स्वंयघोषणापत्र :

जात प्रमाणपत्र स्वंयघोषणापत्र भरु द्यावे लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावे लागते.

(https://aaplesarkar.mahaonline.gov.in/mr/Login/Certificate_Documents?ServiceId=1284)

आपले सरकार पोर्टलवर किंवा तहसीलदार कार्यालयात वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर 21 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमचा अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली असतील तर मंजूर होईल आणि तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र मिळून जाईल.

सौंदर्यात भर! मराठा साम्राज्याच्या राजधानीत होणार पाच Selfi Point; राजवाड्यात शिल्पसृष्टीचाही पालिकेचा मानस

हेही वाचा : आपले सरकारवरुन अर्ज सादर केल्यानंतर 21 दिवसांपर्यंत आपल्याला जात प्रमाणपत्र मिळेल. काही अडचणीमुळे प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास 15 दिवसानंतर आपले सरकारच्या वेबसाईटवर लॉगीन करुन अपील अर्ज सादर करु शकता. असे केल्याने आपल्याला हे प्रमाणपत्र त्वरित मिळून जाईल, तसेच याबाबतच्या अधिक माहितीसाठी शासनाच्या संबंधित विभागाशी देखील चर्चा करुन हा प्रश्न आपण सोडवू शकता.

loading image
go to top