महाबळेश्‍वरचा होणार संपूर्ण कायापालट; मुख्यमंत्र्यांच्या पर्यावरणमंत्र्यांना सूचना

गिरीश चव्हाण
Saturday, 16 January 2021

महाबळेश्‍वरची पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन वेण्णा तलावाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीदरम्यान दिले.

सातारा : महाबळेश्‍वरची पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन वेण्णा तलावाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीदरम्यान दिले. पोलो मैदानासाठीच्या जागेचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. महाबळेश्‍वरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या लघू व दीर्घ पल्ल्याच्या विविध कामांचे प्रस्ताव तातडीने देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे महाबळेश्‍वरचा संपूर्ण कायापालट होण्यास मदत होणार आहे. 

महाबळेश्वरचा पर्यटन विकास करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या वेळी पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, मुख्य सचिव संजयकुमार, प्रधान सल्लागार अजोय महेता, अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर- सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, पंकज जोशी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह हे ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले होते. 

राजू शेट्टी, सदाभाऊंची तब्बल 47 गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता; कऱ्हाड न्यायालयाचा निकाल

बैठकीत महाबळेश्वरच्या पर्यटन विकासासाठी तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. महाबळेश्वर पर्यटन आराखडा तयार करताना तातडीची व दीर्घ कालावधीची अशी कामांची वर्गवारी करावी व त्याची टप्पानिहाय अंमलबजावणी करावी. आराखडा केल्यानंतर कमी कालावधीची कामे तत्काळ हाती घेण्यावर लक्ष केंद्रित करावे, महाबळेश्वर बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरण, वेण्णा लेक परिसराची कामे पहिल्या टप्प्यात हाती घ्यावीत. पर्यटनाला दर्जा राहावा, पर्यटकांना उत्तम सोयी- सुविधा मिळाव्यात व त्या माध्यमातून पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी स्थानिकांना विश्‍वासात घेऊन ही कामे करावीत. कामांची संपूर्ण माहिती देणारे फलक त्या ठिकाणी लावावेत आदी सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केल्या.

शरद पवारांचे आत्मचरित्र हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावे; सदाभाऊंचा खोचक टोला  

वन, पर्यावरण, पर्यटन विभागाने समन्वयाने महाबळेश्वर पर्यटन आराखड्याची कामे करण्याच्या सूचनाही त्या वेळी केल्या. पोलो मैदानासाठीच्या जागेचा प्रस्ताव पालिकेने तयार करून तो राज्याच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे पाठवावा. मैदान तयार झाल्यानंतर तेथे स्पर्धा आयोजित करता येतील, ते ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल, 31 जानेवारीपर्यंत वेण्णा लेक परिसर सुशोभित करावा, पहिल्या टप्प्यात मार्केट आणि लेक परिसराचे काम हाती घेण्याच्या सूचनाही श्री. ठाकरे यांनी केल्या. वेण्णा लेकची क्षमता पाच एमएलटीवरून 19 एमएलटीपर्यंत वाढवण्याबाबतचा प्रस्ताव तयार सादर करण्यासही त्यांनी सांगितले. महाबळेश्‍वर पर्यटन आराखड्याची अंमलबजावणी करताना रस्ते, वाहतूक व्यवस्था, पदपथ, बाजारपेठ यांची रचना, तेथील रंगसंगती, पथदिवे, व्हर्टिकल गार्डन, रस्ते क्रॉसिंग, निर्मिती यांच्यात एकवाक्‍यता असावी. वाहतुकीचे व्यवस्थापन असावे, अशा सूचना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या. 

माणमध्ये 47 पंचायतींसाठी चुरशीने मतदान; 724 उमेदवारांचे भवितव्य यंत्रांत बंद

मुख्यमंत्री म्हणाले... 

  • कामांची वर्गवारी, टप्पानिहाय अंमलबजावणी 
  • स्थानिकांना विश्‍वासात घेत कामे करणार 
  • वाहतुकीचे व्यवस्थापन होणार 
  • कामांची संपूर्ण माहिती देणारे फलक लावणार 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Meeting Of Chief Minister Uddhav Thackeray In Mumbai Regarding Mahabaleshwar Tourism Development