esakal | 'उरमोडी'साठी भाऊसाहेबांनी खर्च केली आमदारकीची 20 वर्षे : झेडपी सदस्य सुरेंद्र गुदगे
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

उरमोडीच्या पाण्यामुळे शिरसवडीपासून मायणीपर्यंतचा भाग ओलिताखाली येणार असल्याचे मत सुरेंद्र गुदगे यांनी सांगितले.

'उरमोडी'साठी भाऊसाहेबांनी खर्च केली आमदारकीची 20 वर्षे : झेडपी सदस्य सुरेंद्र गुदगे

sakal_logo
By
अंकुश चव्हाण

कलेढोण (जि. सातारा) : दुष्काळी भागातील शेती उरमोडीच्या पाण्याने ओलिताखाली आणून हजारो एकर क्षेत्र सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न (कै.) भाऊसाहेब गुदगेंनी बघितले होते. त्यासाठी आपल्या आमदारकीच्या 20 वर्षांची ताकद त्यांनी खर्च केल्याचे जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी सांगितले. 

तारळी प्रकल्पाच्या नूतन पाणीवापर संस्था हस्तांतरणावेळी ते बोलत होते. त्यावेळी पाणी वितरक संस्था प्रशिक्षक जितेंद्र कासार, युवक नेते ऋत्वीक गुदगे, बाजार समितीचे माजी संचालक दादासाहेब कचरे, पाणीवापर संस्थांचे अध्यक्ष नामदेव शिंदे, संजय यलमर, ग्रामपंचायत सदस्य रणजित माने आदी उपस्थित होते. गुदगे म्हणाले, ""शेतकऱ्यांना उरमोडीचे पाणी तारळी प्रकल्पाच्या कॅनॉलमधून पोचावे, या उद्देशाने शासनाच्या धोरणानुसार विठोबा पाणीवापर संस्था, यशवंतबाबा महाराज पाणीवापर संस्था, संत सावता माळी पाणीवापर संस्था व हनुमान पाणीवापर संस्थांची निर्मिती करण्यात आली. 

असं मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेलं बर; व्यापा-यांची भावना समजून घ्या : शिवेंद्रसिंहराजे 

या संस्था शासन आणि शेतकरी यांच्यातील धुवा ठरणार असून त्यामुळे पाणी वाटपात समानता येणार आहे. या पाण्यामुळे शिरसवडीपासून मायणीपर्यंतचा भाग ओलिताखाली येणार असून पाणीवापर संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माफक दरामध्ये पाणी मिळणार आहे. पाणी वाटपाबाबत समानता येण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे सांगण्यात आले. दादासाहेब कचरे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल माळी यांनी आभार मानले. 

व्यापा-यांमुळे काेराेना हाेताे का? आम्ही दुकान सुरु ठेवणारच!

बाळासाहेबांनी सर्वधर्मसमभाव जोपासत, कष्टकरी जनता, शेतकऱ्यांसाठी अखेरपर्यंत तडफेने काम केले : रामराजे 

जिल्हा परिषदेत एजंटगिरी चालू देणार नाही; उदय कबुलेंचा इशारा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image