पाटणकरांच्या आजारावर शासनाची मलमपट्टी; 'तहसील'चा कारभार टोपेंकडे

Satara Latest Marathi News, Satara News
Satara Latest Marathi News, Satara News
Updated on

पाटण (जि. सातारा) : मागील 27 महिन्यांत दहा महिने बिनअधिकारी आणि एक वर्ष प्रभारी तहसीलदार असा पाटणच्या तहसील कार्यालयाचा कारभार सुरू आहे. नुकतीच परिविक्षाधिन कालावधीसाठी पाटणला योगेश्वर टोंपे यांची नेमणूक केली आहे. हा प्रकार म्हणजे पाटणच्या जनतेच्या मूळ आजारावर उपचार करण्याऐवजी शासनाने केवळ मलमपट्टी केली आहे. 15 ऑगस्टपर्यंत प्रभारी कारभारी टोंपेंना मात्र अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. 

17 महिन्यांपूर्वी म्हणजे 16 सप्टेंबर 2019 रोजी वादग्रस्त तहसीलदार रामहरी भोसले यांची बदली झाली. त्याअगोदर 14 नोव्हेंबर 2018 रोजी रामहरी भोसलेंचे अधिकार काढले होते. सलग दहा महिने अधिकार नसतानाही त्यांनी पाटणसारख्या तालुक्‍याचा कारभार पाहिला. भोसलेंची बदली झाली आणि रवींद्र माने हे पाटणला नवीन कारभारी मिळाले. मात्र, चारच महिन्यांत 15 जानेवारी 2020 रोजी त्यांनी मंत्री सुनील केदार यांच्याकडे स्विय सहायक म्हणून मंत्रालयात प्रस्थान केले. 16 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असणारे तत्कालीन सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी समीर यादव यांच्याकडे पाटणचा प्रभारी तहसीलदार म्हणून अतिरिक्त कारभार दिला गेला. दोन ऑक्‍टोबर 2020 रोजी त्यांची बदली फलटणला तहसीलदार म्हणून झाली.

दिल्लीच्या जेएनयूचे नाव स्वामी विवेकानंद विद्यापीठ होणार?; केंद्रीय शिक्षणमंत्री निशंक यांची लोकसभेत माहिती
 
कोणताही पर्याय नाही म्हणून निवासी नायब तहसीलदार प्रशांत थोरात यांच्यावर प्रभारी तहसीलदार म्हणून जबाबदारी सोपवली. श्री. थोरात यांनी चार महिने अनेक आघाड्यांवर मोहीम राबविताना चार नायब तहसीलदारांच्या भूमिकाही बजावल्या. कधी कसोटी, कधी वनडे तर कधी ट्‌वेंटी-ट्‌वेंटी सामनेही खेळले. मात्र, विकेट जाऊ दिली नाही. जूनपर्यंत आपणच कर्णधार असणार, असा अंदाज बांधून ते मैदानावर चौफेर फटकेबाजी करीत होते. परंतु, अचानक वाई येथे परिविक्षाधिन निवासी नायब तहसीलदार कालावधी पूर्ण केलेल्या योगेश्वर टोंपे यांची परिविक्षाधिन कालावधीसाठी अर्थात 15 ऑगस्टपर्यंत पाटणचे तहसीलदार म्हणून आदेश काढले.

जूनपर्यंत आपणाकडे कोणीही येणार नाही, अशी मानसिकता ठेवलेल्या जनतेचा आणि जूनपर्यंत आपणच कारभारी असणार, असा ठाम विश्वास असणाऱ्या थोरात यांचा मात्र अपेक्षाभंग झाला. 27 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मूळ आजारावर उपचार किंवा शस्त्रक्रिया न करता तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला आहे. पाटणसारख्या तालुक्‍यात असा गचाळपणा म्हणजे गोरगरीब जनतेला आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा प्रकार आहे. परिविक्षाधिन कालावधीसाठी आलेल्या टोंपेंना मात्र सहा महिन्यांत 27 महिन्यांचा बॅकलॉग भरून काढताना दैनंदिन कामकाजाचे आव्हान पेलावे लागणार आहे. 

15 ऑगस्टनंतर पुन्हा जनतेच्या नशिबी प्रभारी 

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सरासरी जून महिन्यामध्ये बदल्या होतात. नवीन तहसीलदारांचा परिविक्षाधिन कालावधी हा 15 ऑगस्ट असल्याने पाटणला पुन्हा या वर्षात कायमस्वरूपी तहसीलदार भेटणार नाही. त्यामुळे 15 ऑगस्टनंतर पुन्हा जनतेच्या नशिबी प्रभारी कारभारीच येणार. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com