esakal | 'अक्कड बक्कड डिझेल नब्बे... पेट्रोल सौ'; कऱ्हाडात दरवाढीविरोधात कॉंग्रेसची जोरदार घोषणाबाजी
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

सध्या डिझेल 90, तर पेट्रोल शंभरच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनामुळे मजूर, छोटे व्यापारी, शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत.

'अक्कड बक्कड डिझेल नब्बे... पेट्रोल सौ'; कऱ्हाडात दरवाढीविरोधात कॉंग्रेसची जोरदार घोषणाबाजी

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : "अक्कड बक्कड डिझेल नब्बे... पेट्रोल सौ, सबका साथ..विश्‍वासघात, सस्ती दारू... महंगा तेल, कहॉं गये..कहॉं गये... अच्छे दिन..., नही चलेंगी.. नही चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी' अशा घोषणांनी कोल्हापूर नाका दणाणून गेला. निमित्त होते, युवक कॉंग्रेसच्या वतीने आयोजित पेट्रोल- डिझेल व गॅस दरवाढी विरोधातील आंदोलनाचे. 

येथील कोल्हापूर नाक्‍यावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ युवक कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, शहर कॉंग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, मलकापूरचे नगरसेवक राजेंद्र यादव, वैभव थोरात, दिग्विजय सूर्यवंशी, अमित जाधव, आमीर आतार, राहुल पवार, श्रीकांत मुळे, अभिजित चव्हाण, रोहित पाटील, शुभम लादे, विक्रम जाधव, जितेंद्र यादव, धनंजय येडगे यांच्यासह युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर कोल्हापूर नाका ते पोपटभाई पेट्रोल पंपाच्या चौकापर्यंत फेरी काढत रास्ता रोको करण्यात आला. 

हे पण वाचा- झऱ्यांच्या पाण्यासाठी अश्रूंचे झरे! पोलिस व महसूल प्रशासनाला फुटेना पाझर

त्यादरम्यान शिवराज मोरे म्हणाले,"" राज्यातील जिल्हा, तालुका पातळीवर युवक कॉंग्रेसचे पेट्रोल-डिझेल या दरवाढी विरोधात आंदोलन चालू आहे. डिझेल-पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले आहेत. ज्यावेळी कॉंग्रेसचे सरकार होते, तेव्हा नरेंद्र मोदी, अमित शहा, स्मृती इराणी, अरुण जेटली या भाजपच्या नेत्यांनी पेट्रोल-डिझेलचे भाव 35 ते 40 रुपये करू, असे आश्वासन दिले. सध्या डिझेल 90, तर पेट्रोल शंभरच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनामुळे मजूर, छोटे व्यापारी, शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. अशातच पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढ झाल्याने त्याचा आम्ही निषेध करत आहोत.'' 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे