esakal | कस्तुरबा रुग्णालयासह, सिव्हील, गाेडीलीत लसीकरणास ज्येष्ठांची गर्दी

बोलून बातमी शोधा

Covid 19 Vaccination

कस्तुरबा रुग्णालयासह, सिव्हील, गाेडीलीत लसीकरणास ज्येष्ठांची गर्दी

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना लशीचा साठा संपल्याने लसीकरण मोहीम ठप्प झाली होती. जिल्ह्याला 40 हजार कोविशिल्ड आणि तीन हजार कोव्हॅक्‍सिन लशींचे डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांत लशीचे वाटप केले असून, लसीकरण मोहीम पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम एक मार्चपासून सुरू झाली. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयासह आरोग्य केंद्रांत मोठा प्रतिसाद मिळत होता. तसेच दररोज 20 हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवल्याने अचानक जिल्ह्यातील लशीचा साठा संपल्याने लसीकरण मोहीम बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागले होते. मात्र, सद्य:स्थितीत लशीचे डोस जिल्ह्याला उपलब्ध झाल्याने लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे पाच लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, सर्वाधिक लसीकरण कोविशिल्ड लशीचे झाले आहे.

कोरोनाग्रस्तांचा जीव वाचविण्यासाठी कदम आले धावून

Google ने कोरोना वाॅरियर्सला खास अंदाजात म्हटले Thank You

जिल्ह्यात 43 हजार लशीचे डोस उपलब्ध झाल्यानंतर 72 प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व जिल्हा रुग्णालयात विभागून लशीचे वाटप केले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून ठप्प झालेली कोरोना लशीची मोहीम पुन्हा एकदा वेग घेत असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने सांगितले. शहरातील राजवाडा परिसरातील कस्तुरबा रुग्णाल, गाेडाेलीतील प्राथमिक आराेग्य केंद्र आणि जिल्हा आराेग्य रुगणालय येथे लसीकरणास ज्येष्ठ नागरिकांची लस घेण्यास गर्दी झाली हाेती.

मोहिते-पाटलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढ; युवतीने धुडकावली Offer

'टेस्ट लवकर केल्यामुळे दोनच दिवसांत कोरोना पळाला!'