जो कष्ट घेतो, तोच बाजी मारतो..!

पृथ्‍वीराज चव्‍हाण
पृथ्‍वीराज चव्‍हाण

कऱ्हाड, (जि. सातारा) : येथील सुपुत्र प्रसाद चौगुले यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचा आमदार चव्हाण यांच्या हस्ते सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार चव्हाण यांनी झाडाचे रोप देवून प्रसाद याचा सत्कार केला. यावेळी प्रसादचे वडील बसवेश्वर चौगुले उपस्थित होते. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसादचे कौतुक करून त्याच्याशी संवादही साधला.  अमदार चव्हाण म्हणाले, प्रसाद चौगुले यांनी प्रथम प्रयत्नातच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. ती तालुक्‍यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. राज्यात अनेक विद्यार्थी अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. त्यात परीक्षाच स्पर्धेची असल्याने त्यामध्ये जो बाजी मारत पुढे येतो, त्याचेच अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होते. त्यामुळे प्रसाद याचे यश सहज मिळालेले नाही. त्यासाठी त्याने आत्मसात केलेली अभ्यासाची हातोटी सर्वांसाठी प्रेरणादायक ठरेल.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर प्रसाद याचे उत्तम उदाहरण आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा माहीत असते. आजूबाजूला काय सुरू आहे, याची माहिती ते सतत घेत असतात. एखाद्या विषयाची खोलात जाऊन अभ्यास करण्याची वृत्ती विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेली असते. त्यामुळेच स्पर्धा परीक्षेत जरी एखादा विद्यार्थी अपयशी झाला असला तरी त्याने खचून न जाता अभ्यासात सातत्यात ठेवावे. अशा संधी आजूबाजूला असतात, फक्त त्या आपण शोधणं गरजेचं असतं, असेही ते म्‍हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com