कितीही गुन्‍हे दाखल करा, मी मूग गिळून गप्‍प बसणा-यातली नाही

Siddhi Pawar
Siddhi Pawar

सातारा : भुयारी गटार योजनेच्‍या (underground drainage scheme) कामावरून फोन करत शिवीगाळ, दमदाटी केल्‍याप्रकरणी सातारा पालिकेच्‍या बांधकाम सभापती सिद्धी पवार (siddhi pawar) यांच्‍याविरोधात नुकतीच शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात (shahupuri police station) अदखलपात्र तक्रार नोंदविण्‍यात आली. या तक्रारीवरुन साै. पवार यांनी ठेकेदार पाेसण्यासाठीच माझ्यावर गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे. (satara-siddhi-pawar-comment-after-registration-police-case-udayanraje-bhosale)

साै. पवार यांच्या विराेधात ठेकेदार वशीम आप्पा तहसीलदार (रा. एकता कॉलनी, करंजे) यांनी नोंदवली आहे. त्यात त्‍यांनी एक जानेवारीला कामादरम्‍यान भिंतीला गेलेले तडे दुरुस्‍त करण्‍याच्‍या कारणावरून सिद्धी पवार यांनी फोन करत कोटेश्‍वर मैदानाजवळ असताना शिवीगाळ, दमदाटी केली असल्‍याचे तहसीलदार यांनी तक्रारीत म्‍हटले आहे.

Siddhi Pawar
आपल्या दोन हातात लाखो घरांना प्रकाशमय करण्याची ताकद आहे, बेटा!

अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यावरुन साै. पवार यांनी मी मूग गिळून गप्प बसण्या-यांमधील नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्या म्हणतात सातारकरांच्‍या भावना मी व्‍यक्‍त केल्‍या असून सुरु असणाऱ्या कामाचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. माझे ते संभाषण एक तारखेचे आहे. ते व्‍हायरल केल्‍याने नागरिकांना माझ्‍या कामाची पध्‍दत आणि त्‍यांच्‍याविषयी असणारा कळवळा दिसून येतो. क्‍लिप व्‍हायरल करणाऱ्यांना मी धन्‍यवाद देत असून लोकहितासाठी कितीही गुन्‍हे दाखल झाले तरी त्‍याचा मला फरक पडत नसल्‍याचेही साै. पवार यांनी नमूद केले.

Siddhi Pawar
पर्यटकांना खुशखबर! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर महाबळेश्वर, पाचगणी सोमवारपासून सुरु

मी जे बोलले ते भावनेच्‍या भरात आणि नागरिकांच्या प्रेमापोटी बोलले आहे. माझी भाषा आक्रमक आहे आणि ती मला मान्‍य आहे. लोक मला कामाबाबत विचारतात काय काम चाललेय म्हणून. मी संबंधित काम दिवाळीनंतर करा असे पत्र दिले होते, मात्र त्‍याला केराची टोपली दाखविण्‍यात आली. नेत्‍यांनी माझ्‍यावर गुन्‍हा दाखल करायला सांगितले आहे. त्‍यांचा प्रत्‍येक शब्‍द मी मानते. माझे बोलणे गुन्‍हा असेल तर काम चार वर्षे रखडवले त्‍यांच्‍यावर का गुन्‍हा दाखल होत नाही, कशाची वाट बघताय, असा सवालही पवार यांनी यावेळी उपस्‍थित केला.

Satara Mayor Madhavi Kadam
Satara Mayor Madhavi Kadam
Siddhi Pawar
पवारांचा कथित राजीनामा माझ्यापर्यंत आलाच नाही

मी मुग गिळून गप्‍प बसणार नाही, मी नागरिकांच्या प्रश्‍‍नावर बोलणारच. नागरिकांसाठी गुन्‍हे दाखल करून घेण्‍यास मी तयार आहे. कितीही आरोप झाले आणि गुन्‍हे दाखल झाले तरी त्‍याचा माझ्‍यावर फरक पडत नसल्‍याचे सांगत कायद्यावर माझा विश्‍‍वास असल्‍याचेही पवार यांनी नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com