Satara ZP Election Winner List 2026 : सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल; वाचा कोण जिंकले? कोण हरले? पाहा विजयी उमेदवारांची यादी

Satara Panchayat Samiti Election Results 2026 : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून अनेक ठिकाणी नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे.
Satara ZP Election Winner List 2026

Satara ZP Election Winner List 2026

esakal

Updated on

Satara Panchayat Samiti Election Results 2026 : सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ६५ आणि पंचायत समितीच्या १२९ जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला ३३ जागांचा बहुमताचा आकडा कोणत्याही पक्षाला गाठता आलेला नाही.

या निकालांमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वाधिक २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला २० जागा, तर शिंदे गटाच्या शिवसेनेला १५ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला प्रत्येकी एक जागा मिळाली असून, एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र येऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करू शकतात. मात्र, राज्यातील सत्तासमीकरणांचा विचार करता शिंदे गटाची शिवसेना ज्या पक्षासोबत जाईल, त्यांच्याकडेच सत्ता येण्याची शक्यता असून, त्यामुळे सत्तेच्या चाव्या शिंदे गटाकडे राहिल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com