Satara Nagar Panchayat Election | शिवसेनेच्या सुरेखा पखाले बिनविरोध नगरसेविका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Nagar Panchayat Election
शिवसेनेच्या सुरेखा पखाले बिनविरोध नगरसेविका

Satara Election : शिवसेनेच्या सुरेखा पखाले बिनविरोध नगरसेविका

दहिवडी : नगरपंचायतीच्या (Nagar Panchayat) प्रभाग क्रमांक १ मधून शिवसेनेच्या सुरेखा पखाले या बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. शेखर गोरे यांनी बहिणीसाठी केलेली धावाधाव फळाला आल्याने भावाने बहिणीला नगरसेविका पदाची भाऊबीज दिली.

नगरपंचायतीच्या सतरापैकी तेरा जागांची निवडणूक(Election) झाली असून आता चार जागांची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. नुकत्याच दहिवडीच्या नागरिक व मतदार झालेल्या सुरेखा पखाले यांनी प्रभाग क्रमांक १ व १७ मधून शिवसेनेकडून (Shiv Sena) उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूकीत रंगत आणली होती. बहिणीला निवडून आणण्याचा चंग बांधलेल्या शेखर गोरे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र निवडणूक टाळून बहिणीला बिनविरोध निवडून आणण्यासाठी शेखर गोरे यांनी हालचाली गतिमान केल्या होत्या.(Satara Nagar Panchayat Election)

हेही वाचा: 'लवकर भेटू', म्हणत ६० वर्षीय वृद्धाने स्वीकारला इच्छामृत्यू

शेखर गोरे यांच्या पडद्याआड सुरु असलेल्या हालचालींना यश येवून सोमवार १० जानेवारी रोजी भाजपच्या वंदना कटपाळे व काँग्रेसच्या कांता पोळ यांनी आपली उमेदवारी माघारी घेतली होती. तर माघारीसाठी खळखळ करणाऱ्या राष्ट्रवादी प्रियांका पोळ यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. विरोधातील सर्वच उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने सुरेखा पखाले यांना शिवसेनेच्या पहिल्या बिनविरोध नगरसेविका होण्याचा मान मिळाला.

सुरेखा पखाले यांची बिनविरोध निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top