Satara : सुटीवर आलेल्या जवानाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

जवान कुदळे हे आयटीबीपीमध्ये सुटी संपून कामावर हजर होण्यासाठी जाण्याची तयारी करत होते.
Vijay Sudam Kudale
Vijay Sudam Kudaleesakal
Summary

जवान कुदळे हे आयटीबीपीमध्ये सुटी संपून कामावर हजर होण्यासाठी जाण्याची तयारी करत होते.

वाई (सातारा) : गणेशोत्सवासाठी सुटीवर आलेल्या जवानानं (Indian Jawan) साताऱ्यात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय सुदाम कुदळे (व्याजवाडी, ता. वाई, हल्ली मुक्काम प्रेरणा सोसायटी, सातारा) असे आत्महत्या केलेल्या जवानाचं नाव आहे.

कुदळे हे आयटीबीपीमध्ये सुटी संपून कामावर हजर होण्यासाठी जाण्याची तयारी करत होते. शुक्रवारी दुपारी त्यांनी सातारा येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना त्यांचे साडू भानुदास जाधव यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

Vijay Sudam Kudale
Sachin Pilot : सचिन पायलटच होणार राजस्थानचे नवे मुख्यमंत्री? आज काँग्रेस आमदारांची महत्वपूर्ण बैठक

मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. काल व्याजवाडी इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com