esakal | Video : बाळा.. गेलेला माणूस परत येत नसतो, खंबीर बनून आईला सावर
sakal

बोलून बातमी शोधा

Video : बाळा.. गेलेला माणूस परत येत नसतो, खंबीर बनून आईला सावर

भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्‍याम बुवा व ग्रामस्थांना त्यांनी ननावरे यांच्या कुटुंबाला वेळोवेळी भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना मदत करण्याच्या सूचना सातुपते यांनी दिल्या.

Video : बाळा.. गेलेला माणूस परत येत नसतो, खंबीर बनून आईला सावर

sakal_logo
By
पुरुषाेत्तम डेरे

कवठे (जि. सातारा) : वाई पोलिस ठाण्यातील हवालदार गजानन ननावरे यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते येथे आल्या होत्या. ननावरे यांच्या पत्नी व मुलगी, तसेच कुटुंबातील इतर सदस्यांची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून धीर दिला.
प्रसंगी पाण्यात बुडून मरू; परंतु घर सोडणार नाही
 
या वेळी सातपुते यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाकडून कोरोनामुळे ननावरे कुटुंबीयांना सावरण्यासाठी तातडीने मदत व्हावी, या हेतूने दहा लाख रुपयांचा धनादेश श्रीमती प्रभावती ननावरे यांच्याकडे सुपूर्द केला. ननावरे यांच्या पत्नी व मुलीची, तसेच कुटुंबातील इतर सदस्यांची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून धीर दिला. ताई मन घट्ट करा, असा माय-लेकींना आधार देताना त्यांनी या आजारातून बरे व्हावे, यासाठी आपण सर्वांनीच खूप प्रयत्न केले; परंतु आपल्याला अपयश आले. आता तुम्ही सर्वांनी यातून सावरून मुलगी आर्याच्या पुढील शिक्षण व भवितव्याकडे लक्ष द्या. त्यासाठी माझ्याकडून पोलिसांची कुटुंबप्रमुख म्हणून सर्व ती मदत व सहकार्य करण्याची ग्वाही सातपुते यांनी या वेळी दिली. यासाठी कसलाही संकोच न ठेवता तुम्ही माझ्याशी कधीही थेट संपर्क साधा, असे सांगितले.

जाणुन घ्या, कोयना धरणातून केव्हा साेडले जाणार पाणी

कऱ्हाडात व्हेंटिलेटरचा तुटवडा, व्यापाऱ्याचा मृत्यू; नागरिक प्रशासनास जाब विचारणार
 
भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्‍याम बुवा व ग्रामस्थांना त्यांनी ननावरे यांच्या कुटुंबाला वेळोवेळी भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना मदत करण्याच्या सूचना सातुपते यांनी दिल्या. या वेळी कवठ्याचे सरपंच श्रीकांत वीर, उपसरपंच संदीप डेरे, राहुल डेरे, पोलिस पाटील वर्षा ससाणे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. 

डॉक्‍टर होण्यासाठी मदत करेन 

सातपुते यांनी ननावरे यांची 14 वर्षांची कन्या आर्या हिच्याशी हितगुज साधत, बाळा गेलेला माणूस परत येत नसतो. तुला खंबीर बनून आपल्या आईला सावरायचे आहे. तिच्याकडे लक्ष देऊन काळजी घे, असे सांगून तू भविष्यात शिक्षण घेऊन काय बनणार, असे विचारले असता, तिने पप्पांची इच्छा मी डॉक्‍टर व्हावे, अशी होती. असे सांगताच ती रडू लागली. मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करावयाचे आहे, असे सांगितले. यावर सातपुते यांनी शिक्षण घेऊन तू खूप मोठी हो. मी तुला डॉक्‍टर होण्यासाठी हवी ती मदत करेन, असे सांगितले.

संपादन : संजय शिंदे
 

loading image
go to top