esakal | कोयना-कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

कोयना-कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

पालिकेने सावधानतेचे आवाहन केले आहे.

कोयना-कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

sakal_logo
By
(शब्दाकंन - सचिन शिंदे)

कऱ्हाड (सातारा): रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे 24 तासात कोयना नदीच्या पात्रात तब्बल 15 तर कृ्ष्णा नदीच्या पात्रात 11 फुटांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा: साताऱ्यासह कऱ्हाड, फलटण, खंडाळ्यात कहर; बाधितांत मोठी वाढ

कऱ्हाडला रात्रभर 85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नदी पात्रात झपाट्याने होणारी वाढ व पावसाच्या सतत धारेने कोयना व कृष्णा नदी काठावरील नागरिकांना सावध राहणाचा इशारा दिला आहे. पालिकेने सावधानतेचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: कोयना धरणातून नदी पात्रात 1050 क्यूसेक विसर्ग

कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग ३७ हजार ६२४ क्युसेक झाला आहे. कृष्णा नदीची कालची पाणी पातळी आठ फूट दोन इंच होती ती आज १९ फूट झाली आहे. कोयना नदीची पाणी पातळी काल १७ फूट दोन इंच होती ती रात्रभरच्या पावसाने ती ३० फूट नऊ इंच झाली आहे. कऱ्हाडला रात्रभर ८५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खोडशी बंधाऱ्याजवळ पाणी पातळी सात फूट आहे.

हेही वाचा: 'कोयना' आता जगाच्या नकाशावर; पर्यटनासाठी शासनाकडून 71 लाखांचा निधी

तेथील खोडशीचा पाण्याचा विसर्ग २८३६ क्यूसेक आहे. तर वीज निर्मितीनंतरचा विसर्ग ८८३ क्युसेक आहे. दोन्ही मिळून खोडशीचा विसर्ग ३७१९ क्युसेक झाला आहे. वारूंजी येथील पाणी पातळी २८ फूट ११ इंच आहे. येथील पाण्याचा विसर्ग ३३ हजाल १९ क्युसेक आहे. कोयना नदीच्या पूला जवळची आज पाणी पातळी ३० फूट ९ इंच तर कृष्णा नदीची पूल जवळची आज पाणी पातळी १९ फूट आहे.

loading image