'... अन्यथा FRP साठी गनिमीकाव्याने आंदोलन'; बळीराजा संघटनेचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'... अन्यथा FRP साठी गनिमीकाव्याने आंदोलन'; बळीराजा संघटनेचा इशारा

'... अन्यथा FRP साठी गनिमीकाव्याने आंदोलन'; बळीराजा संघटनेचा इशारा

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : एकरकमी एफआरपीसाठी आज साखर आयुक्तांसमवेत बैठक आयोजिण्यात आली होती. मात्र, त्या बैठकीस साखर कारखानदारांना बोलवलेले नाही. त्यामुळे बळीराजा शेतकरी संघटनेने त्या बैठकीवर बहिष्कार टाकून साखर आयुक्तांच्या पत्राची आज तहसीलदार कार्यालयासमोर होळी केली. दरम्यान, दहा दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन आज स्थगित करीत असून, यापुढे एकरकमी एफआरपीसाठी गनिमीकाव्याने आंदोलन केले जाईल, असा इशारा बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी आज दिला.

हेही वाचा: दहा वर्षाच्या चिमुरडीवर घरातल्या नोकरानेच केला बलात्कार; गंभीर जखमी

अध्यक्ष पाटील, प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला व सहकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्याचा तोडगा निघावा, यासाठी मागील आठवड्यात प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी साखर आयुक्तालयाशी संबंधित लोकांची बैठक घेतली होती. त्यामध्ये साखर आयुक्तांबरोबर आज बैठक आयोजिण्याचे ठरले होते. त्यानुसार आज आयुक्त शेखर गायकवाड यांच्याबरोबर बैठक आयोजिली आहे. त्या बैठकीस केवळ शेतकरी संघटनेच्या नेत्यांनाच बोलविण्यात आले असून, कारखान्याचे अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालक यांना बोलविले नाही. त्यामुळे त्या बैठकीवर बळीराजा संघटनेने बहिष्कार घालून आज त्या पत्राची तहसीलदार कार्यालयासमोर होळी केली.

दरम्यान, यापुढील आंदोलनासंदर्भात पंजाबराव पाटील म्हणाले, ‘‘आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळावे, यासाठी आंदोलन केले होते. मुठभर शेतकऱ्यांनी साथ दिली, तर ढिगभर खटल्यावर बसून आम्हाला आशीर्वाद दिले. सरकारने कायद्याचा वापर करून शेतकऱ्यांना न्याय देता येतो. मात्र, कारखानदारांच्या हातातच सरकार असल्याने न्याय दिलेला नाही. मुजोर कारखानदारांना वठणीवर आणायचे असेल, तर शेतकऱ्यांनी साथ द्यायला हवी होती. साखर आयुक्तांनी आम्हाला फसविण्याचाच प्रयत्न केला. ते साखर कारखानदारांच्या आमिषाला बळी पडले. आता आम्ही आंदोलन स्थगित करीत असून, यापुढे गनिमी काव्याने बळीराजा शेतकरी संघटनेकडून आंदोलन करून कारखानदारांना सळो की पळो करून सोडू.’’

हेही वाचा: हर्बल हुक्क्याला दिल्लीत परवानगी; वाचा काय म्हणालं हायकोर्ट?

अधिकारी मंत्र्यांचे गुलाम झालेत

साखर आयुक्त आणि प्रशासनाने आमची बोळवण केली. ते मंत्र्यांचे गुलाम म्हणून राहिले आहेत, असा आरोप करून बी. जी. पाटील यांनी आमच्याबरोबर मुठभर मावळे असले, तरी ढिगभर शेतकऱ्यांनी साखर कारखानदारी टिकली पाहिजे, यासाठी बळीराजा संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा द्या, असे आवाहन केले.

loading image
go to top