Khambatki Ghat : पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटात 8 तास वाहतूक ठप्‍प; सलग सुट्यांमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम

घाट अधिक काळ जाम राहू नये म्‍हणून पोलिसांनी ही वाहतूक बोगद्यामार्गे वळविली.
Pune Bangalore Highway Khambatki Ghat
Pune Bangalore Highway Khambatki Ghatesakal
Summary

रविवार आणि नाताळची सोमवारची सुटी अशा नियोजनाने अनेक जण महाबळेश्‍‍वर, गोव्‍याकडे निघाले आहेत.

खंडाळा : पुणे- बंगळूर महामार्गावरील (Pune-Bangalore Highway) खंबाटकी घाटातील (Khambatki Ghat) पाचव्‍या वळणावर काल (शनिवार) सकाळी आठच्‍या सुमारास दोन ट्रक बंद पडल्‍याने आणि सलगच्‍या सुट्यांमुळे वाहनांची संख्‍या वाढल्‍याने सातारा, महाबळेश्‍‍वरकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक जवळपास आठ तास ठप्‍प (Traffic Jam) झाली.

पोलिसांच्‍या प्रयत्‍नानंतर सायंकाळी चारनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. सध्‍या नाताळ सणाची धामधूम सुरू आहे. त्‍यामुळे रविवार आणि नाताळची सोमवारची सुटी अशा नियोजनाने अनेक जण महाबळेश्‍‍वर, गोव्‍याकडे निघाले आहेत. त्‍यामुळे आज शनिवारी महामार्गावर वाहनांची संख्‍या मर्यादेबाहेर वाढली होती.

Pune Bangalore Highway Khambatki Ghat
Mahabaleshwar Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला! 'मिनी काश्मीर' महाबळेश्वर थंडीनं गारठलं

या वाहनांना दोन्‍ही ठिकाणी जाण्‍यासाठी महामार्गावरील खंबाटकी घाटाचाच वापर करावा लागतो. त्‍यातच या घाटातील पाचव्‍या वळणावर सकाळी आठच्‍या सुमारास दोन ट्रक बंद पडले. त्‍यानंतर मागून येणारी वाहने वाढू लागली आणि वाहतूक कोंडीही सुरू झाली. हळूहळू घाटात मोठी कोंडी झाली, तर काही वाहने गरम होऊन बंद पडली. त्‍यामुळे घाटातील वरच्‍या वळणांवरून सुमारे तीन किलोमीटरपर्यंत खाली पारगाव- खंडाळा येथपर्यंत वाहनांच्‍या रांगा लागल्‍या.

Pune Bangalore Highway Khambatki Ghat
Satara News : साताऱ्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; पोलिस अधीक्षकांनी काढला महत्त्वाचा आदेश

यावेळी घाट अधिक काळ जाम राहू नये म्‍हणून पोलिसांनी ही वाहतूक बोगद्यामार्गे वळविली. त्‍यानंतर दुपारी महामार्गावरील वाहनांची संख्‍या कमी होऊन वाहतूक सुरळीत झाली. ही वाहतूक सुरळीत होण्‍यासाठी सहायक पोलिस निरीक्षक हर्षद गालिंदे, पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजू आहिरराव, श्री. फरांदे, नितीन महागंरे, अमित चव्हाण, दत्तात्रय धायगुडे व वाहतूक पोलिसांनी दिवसभर प्रयत्‍न केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com