esakal | साता-यात 18 ते 44 वयाेगटाचे लसीकरणास प्रारंभ

बोलून बातमी शोधा

vaccination

तुम्ही 18 ते 44 वयाेगटाचे आहात? साता-यात येथे सुरु आहे लसीकरण

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : जिल्ह्यात शनिवारपासून (ता. एक) 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोरोनाच्या लशीचे प्रायोगिक तत्त्वावर प्रथम पाच ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय सातारा, उपजिल्हा रुग्णालय कऱ्हाड, ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ व प्राथमिक आरोग्य केंद्र खटाव या ठिकाणी हे लसीकरण होणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली आहे.

आज (साेमवार) सातारा शहरातील जिल्हा रुग्णालयात 18 ते 44 वयाेगटातील नागरिकांना लस देण्यात येत आहे. ज्यांना लस देण्यात येत आहे त्यांना एसएमएस गेल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली. याबराेबरच जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात लसीकरणास पात्र असलेल्यांच्या नावांच्या यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबराेबरच पालिकेच्या कस्तूरबा रुग्णालय येथे 45 वयाेगटाच्यावरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. येथे काेवीशिल्डची लस उपलब्ध आहे.

सेनेचे मंत्री म्हणतात, 'लाश वही है सिर्फ कफन बदला गया'

डॉ. आठल्ये म्हणाले, ""केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी केंद्र शासनाच्या कोविन या ऍपवर ऑनलाइन नोंदणी करावी. ऑनलाइन नोंदणी करून तारीख व वेळ घेतलेल्या नागरिकांना मिळालेल्या दिनांक व वेळेलाच लसीकरण करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत वॉकइन किंवा ऑन द स्पॉट नोंदणी व लसीकरण करण्यात येणार नाही. नागरिकांनी लसीकरणाकरिता प्रशासनास सहकार्य करावे. लस उपलब्ध होताच जिल्ह्यातील इतर ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: आता कसं हाेणार? अनिल अंबानींपुढे निर्माण झालाय पेच

हेही वाचा: 'जामिनावर सुटला आहात; महागात पडेल' संतापलेल्या चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना इशारा