esakal | स्वामी विवेकानंद संस्थेची 'ती' शाळा पाडण्याचे ब्राह्म समाजाकडून स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

स्वामी विवेकानंद संस्थेची 'ती' शाळा पाडण्याचे ब्राह्म समाजाकडून स्पष्टीकरण

इमारत पाडताना त्याठिकाणचे सर्व साहित्य आम्ही सुरक्षित बाहेर काढत त्याची यादी पोलिसांसमक्ष तयार केली आहे असे डाॅ. साबळेंनी नमूद केले.

स्वामी विवेकानंद संस्थेची 'ती' शाळा पाडण्याचे ब्राह्म समाजाकडून स्पष्टीकरण

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : वाई येथील ब्राह्म समाजाच्या वाड्यात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची शाळा भरत होती. शाळा भरणारी इमारत धोकादायक असून, ती उतरविण्याचे आदेश वाई पालिकेने आम्हाला केले होते. यानुसार सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करत ती इमारत आम्ही पाडल्याची माहिती वाई ब्राह्म समाजाच्या डॉ. प्रियांका साबळे, डॉ. राजेंद्र साबळे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली. 

डॉ. प्रियांका आणि डॉ. राजेंद्र साबळे म्हणाले, ""दीडशे वर्षे पूर्वीच्या वाड्यात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची शाळा भरत होती. वाडा जीर्ण झाल्याने त्याची पडझड सुरू होती. मध्यंतरीच्या काळात पालिकेने आम्हाला ती जीर्ण इमारत पाडण्याची नोटीस बजावली होती. या इमारत न पाडल्यास व दुर्घटना घडल्यास आमच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे नमूद केले होते. यानुसार आम्ही त्या शिक्षण संस्थेशी अनेक पत्रव्यवहार केले. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. पालिकेने आम्हाला दिलेली मुदत संपत आल्याने आम्ही वाई पोलिसांना सर्व कागदपत्रे दाखवली व त्यांच्या उपस्थितीतच ती इमारत पाडली. मनुष्यहानी होऊ नये, या एकाच उद्देशाने ती इमारत आम्ही पाडली आहे.''
 
इमारत पाडताना त्याठिकाणचे सर्व साहित्य आम्ही सुरक्षित बाहेर काढत त्याची यादी पोलिसांसमक्ष तयार केली आहे. याबाबतची माहिती आम्ही स्वामी शिक्षण संस्थेला दिली आहे. असे असतानाही आमच्यावर जाणीवपूर्वक आरोप करण्यात येत असल्याचेही डॉ. राजेंद्र साबळे यांनी सांगितले.

तुम्ही यात पडू नका, तुम्हाला महागात पडेल; गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना धमकी

राजकीय व्यवस्था संवेदनशील असायला हवी; तावडेंचा सरकारला टाेला

जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने विकासकामाला गती; अपशिंगे-देशमुखनगरला अडीच कोटींचा निधी

391 व्या शिवजयंतीनिमित्त 391 देशी झाडे लावून शिवरायांना मानवंदना द्या; अभिनेते सयाजी शिंदेंचे आवाहन

चर्चाच चर्चा! उदयनराजेंची उद्धव ठाकरेंशी,शिवेंद्रसिंहराजे - अजित पवार

भावजय सरपंच, दीर उपसरपंच; अंधारी-कासला शेलार कुटुंबात आनंदाेत्सव

Edited By : Siddharth Latkar