वाई पालिका रुग्णांना घरपोच वैद्यकीय सेवा देणार

वाई पालिका रुग्णांना घरपोच वैद्यकीय सेवा देणार

वाई (जि. सातारा) : पालिकेच्या झालेल्या विशेष सभेत गृह विलगीकरणामध्ये ठेवलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना मेडिकल किट पुरविण्याचा तसेच वैद्यकीय सेवा घरपोच देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. कोविड पार्श्वभूमीवर पालिकेची विशेष सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. शहरातील कोविड -19 बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

त्यामध्ये ऍक्‍टिव्ह रुग्णाची संख्यादेखील वाढलेली आहे. भविष्यात अजून रुग्णसंख्या वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सद्य:परिस्थितीत शासनाच्या निर्देशानुसार हॉस्पिटल्सवर येणारा वाढता ताण पाहता ज्या लक्षणेविरहित बाधित रुग्णांना घरच्याघरीच उपचार देवून बरे करता येणे शक्‍य आहे, त्यांना त्यांच्या राहत्या घरीच गृह विलगीकरणामध्ये ठेवण्यात येत आहे. शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि त्यावर आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यासाठी पालिकेच्या विशेष सभेत चर्चा करण्यात आली. या वेळी गृह विलगीकरणामध्ये ठेवलेल्या बाधित रुग्णांना मेडिकल किट पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला.

नगराध्यक्षांच्या पतींमुळेच महाबळेश्‍वरचा विकास खूंटला : अफझल सुतार

या मेडिकल किटमध्ये कोरोनावर उपचारासाठी डॉक्‍टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे किमान दहा दिवस पुरतील इतकी औषधे. रुग्णाच्या घरी निर्जंतुकीकरण करण्यासाठी सपीया 200 मिलिची बॉटल, डिस्पोजेबल मास्क, हॅण्ड सॅनिटायझर, हॅण्डग्लोज, तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर, ऑक्‍सिजन मोजण्यासाठी पल्स ऑक्‍सिमीटर हे साहित्य असणार आहे. या सर्व वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी पॅरामेडिकल स्टाफ तसेच मेडिकल स्टाफ नियुक्त करण्याकामी निविदा प्रक्रियेद्वारे स्वतंत्र एजन्सी नियुक्त करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. योग्यवेळी ऑक्‍सिजन सुविधा न मिळाल्यामुळे होणाऱ्या बाधितांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. त्यासाठी ऑक्‍सिजन कॉन्सट्रेटर मशिन पुरविण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून ऑक्‍सिजनअभावी कोणाही कोरोना बाधिताला आपले प्राण गमवावे लागू नयेत.

आशालता वाबगावकर यांचा गायिका ते नायिका एक यशस्वी जीवनप्रवास 

आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी करण्याच्या दृष्टीने अतिरिक्त प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्‍यक असल्याने तातडीने विशेष सभा घेऊन सर्वानुमते हे निर्णय घेतल्याचे नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांनी सांगितले. सभेस मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, नगरसेवक महेंद्र धनवे, सतीश वैराट, भारत खामकर, किशोर बागुल, चरण गायकवाड, प्रदीप चोरगे, कांताराम जाधव, नगरसेविका सुमैय्या इनामदार, स्मिता हगीर, वासंती ढेकाणे, रूपाली वनारसे, रेश्‍मा जायगुडे, प्रियांका डोंगरे आणि सर्व विभागप्रमुख व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

पुणे बंगळूर महामार्गावरील सेवा रस्ता खचला 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com