Dhom Dam : संपूर्ण कालवा क्षेत्रात पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणार; खासदार रणजितसिंह निंबाळकरांची ग्वाही

फलटण तालुक्यात पहिल्या टप्प्यात सुमारे २४ गावांत टंचाई घोषित झाली आहे.
MP Ranjitsingh Naik Nimbalkar
MP Ranjitsingh Naik Nimbalkaresakal
Summary

दुष्काळाची वाढती तीव्रता लक्षात घेता टंचाई घोषित गावांची संख्या वाढणार आहे. प्रशासनाच्या माध्यमातून चारा, पाणीटंचाई निवारणासह लोकांना टंचाई निवारण्यासाठी प्रयत्नशील आहे.

विठ्ठलवाडी : फलटण तालुक्यातील (Phaltan) दुष्काळाची वाढती तीव्रता विशेषत: पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन धोम- बलकवडी प्रकल्पातून (Dhom-Balkawadi Project) काल सकाळी पिण्यासाठी विशेष आवर्तन सोडण्यात आले. धरणात असलेला अल्प प्रमाणातील पाणीसाठा लक्षात घेऊन कालव्या लगतच्या गावांना हे पाणी पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येत असून, आणखी १.५ टीएमसी पाण्याची मागणी करणार आहे.

त्यातून संपूर्ण कालवा क्षेत्रात पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची ग्वाही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांनी दिली. फलटण तालुक्यात पहिल्या टप्प्यात सुमारे २४ गावांत टंचाई घोषित झाली असली, तरी दुष्काळाची वाढती तीव्रता लक्षात घेता टंचाई घोषित गावांची संख्या वाढणार आहे. प्रशासनाच्या माध्यमातून चारा, पाणीटंचाई निवारणासह लोकांना टंचाई निवारण्यासाठी प्रयत्नशील आहे.

MP Ranjitsingh Naik Nimbalkar
कोकणात काँग्रेसला धक्का; 'हा' नेता राष्ट्रवादीत प्रवेश करताच जयंत पाटलांनी उमेदवारी केली जाहीर

गरज असलेल्या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, मागणीप्रमाणे टँकरची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. आगामी काळात चारा डेपो, जादा टँकर व दुष्काळ निवारणार्थ अन्य अडचणींबाबत आपण प्रयत्नशील आहोत. कोणाची काहीही अडचण असल्यास संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

MP Ranjitsingh Naik Nimbalkar
कर्नाटक सरकार धोक्यात? राज्यातही आता एकनाथ शिंदे, अजितदादा तयार होणार; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

धोम- बलकवडी प्रकल्पाचे एक आवर्तन पूर्ण होण्यासाठी यापूर्वीच्या आवर्तनावेळी २.४० टीएमसी पाणी उपलब्ध झाले. या वेळी धरणात केवळ ०.५५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असल्याने जादा पाणी उपलब्ध करून घेऊन जास्तीतजास्त गावांपर्यंत पाणी पोचविण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आणून देत लोकांनी पाणी केवळ पिण्यासाठी वापरावे, असे आवाहन निंबाळकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com