Marathwadi Dam Water : मराठवाडी धरणातून वांग नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

सकाळपासून धरणाच्या सिंचनद्वारातून वांग नदीपात्रात (Wang River) तातडीने विसर्ग सुरू करण्यात आला.
Marathwadi Dam Wang river
Marathwadi Dam Wang riveresakal
Summary

धरणाच्या लाभक्षेत्रातील कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळणार असला, तरी बंधाऱ्यांच्या गळतीमुळे हे समाधान किती दिवस टिकेल याबद्दल शंकाच आहे.

ढेबेवाडी : मराठवाडी धरणाच्या (Marathwadi Dam) लाभक्षेत्रात शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने पाटबंधारे विभागाकडून काल सकाळपासून धरणाच्या सिंचनद्वारातून वांग नदीपात्रात (Wang River) तातडीने विसर्ग सुरू करण्यात आला. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना (Farmers) त्यामुळे तूर्तास मोठा दिलासा मिळाला आहे.

नदीवरील ठिकठिकाणच्या बंधाऱ्यांना असलेली गळती काढल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येत असले, तरी त्यांना त्यामध्ये कितपत यश आले आहे, हे येत्या एक दोन दिवसांत बंधारे पाण्याने भरल्यावरच समोर येईल. मराठवाडी धरणात पावसाळ्यापर्यंत (Rainy Season) टिकेल एवढा पाणीसाठा शिल्लक असला, तरी लाभक्षेत्रात नदीपात्रामध्ये बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना गळती असल्याने धरणातून सोडलेले पाणी बंधाऱ्यात टिकत नाही.

Marathwadi Dam Wang river
National Highway : 'या' नव्या राष्ट्रीय महामार्गामुळं महापुराचा धोका; शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

विसर्ग थांबवल्यावर बंधारे कोरडे पडत असल्याने पुन्हा- पुन्हा सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. सध्याही अशीच स्थिती असून, पाण्याअभावी रब्बीसह बागायती पिके धोक्यात असल्याने धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांतून जोर धरू लागली होती.

या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता हर्षवर्धन भोसले यांच्या सूचनेनुसार आज सकाळपासून सिंचनद्वारातून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. धरणाच्या लाभक्षेत्रातील कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळणार असला, तरी बंधाऱ्यांच्या गळतीमुळे हे समाधान किती दिवस टिकेल याबद्दल शंकाच आहे.

Marathwadi Dam Wang river
Kolhapur Madrasa : 'लक्षतीर्थ'मधील विवादित मदरसा इमारत मुस्लिम समाज उतरवून घेणार; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नदीपात्रात प्रवेश न करण्याचे आवाहन

धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्याने वांग नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करून जीव धोक्यात घालू नये. त्याबाबत खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता निखिल खांडेकर यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com