कुस्तीपटू कोमल गोळे यांना खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

सुप्रसिद्ध महिला कुस्तीपटू कोमल गोळे यांना पै. खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून सर्व स्तरांतील लोकांकडून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे.
Wrestler Komal Gole
Wrestler Komal GoleEsakal

सुप्रसिद्ध महिला कुस्तीपटू कोमल गोळे-यादव (Female Wrestler Komal Gole) यांना मानाचा पै.खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार (Award) जाहीर झाल्यानंतर त्यांचं सर्व स्तरांतून अभिनंदन केलं जात आहे.

1952 मध्ये फिनलँडची राजधानी हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक (Helsinky Olympics) स्पर्धेत खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांनी कुस्तीतील पहिल्या कास्य पदकाची (Bronze Medal) कमाई केली होती. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्काराअंतर्गत ‘आदर्श महिला कुस्तीगीर पुरस्कार’ कोमल गोळे-यादव यांना जाहीर झाला आहे.

Wrestler Komal Gole
ऑलिम्पिक पदक विजेत्या धावपटूचे २९ व्या वर्षी अपघातात निधन

कोमल गोळे-यादव या सुप्रसिद्ध कुस्तीपटू असून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. नुर सुलतान, कझागिस्तान येथे झालेल्या सिनियर वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. याशिवाय 2019 मध्ये झालेल्या स्पर्धेतही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्या 3 वेळा सिनियर नॅशनल गोल्ड मेडलिस्ट असून पुणे महापौर गोल्ड मेडलिस्टही आहेत. लवकरच त्या NIS कुस्ती कोच म्हणून नवी कारकीर्द सुरु करण्याच्या तयारीत आहेत. सुप्रसिद्ध युट्यूबर संदिप यादव यांच्या त्या पत्नी असून साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिवासी आहेत. हा पुरस्कार झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Wrestler Komal Gole
ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानूला भेट मिळाली स्पोर्ट्स कार

दरम्यान कोमल गोळे-यादव यांच्यासह सोनाली तोडकर यांनाही आदर्श महिला कुस्तीगीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आदर्श वस्ताद म्हणून अर्जुनवीर काकासाहेब पवार व वस्ताद विश्वासराव हारुगले, आदर्श कुस्ती संघटक संग्रामसिंह कांबळे व योगेश शेवाळे, आदर्श कुस्तीगीर बदाम मगदूम व उमेश सूळ, जीवन गौरव पुरस्कार शंकर पुजारी-कोथळीकर व माने वस्ताद औंध, कोरोना योद्धा म्हणून डॉ. तातोबा पवार, आदर्श पत्रकार म्हणून वैभव गोंधळी तसेच सचिन भोसले यांनाही गौरविण्यात येणार असल्याची माहिती रणजित खाशाबा जाधव यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com