Raj Thackeray : इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावा, अन्यथा परिणाम भोगा; मनसेने दिला आठ दिवसांचा अल्टिमेटम

महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी भाषेविषयी आदर असणे गरजेचे आहे.
Marathi Board MNS
Marathi Board MNSesakal
Updated on
Summary

सर्वोच्च न्यायालयाने मराठी पाट्या लावण्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती.

कऱ्हाड : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानंतरही शहरासह तालुक्यातील अनेक दुकानांना इंग्रजी भाषेत पाट्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. आठ दिवसांत इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या (Marathi Board) लावाव्यात अन्यथा मनसे (MNS) स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण, शहराध्यक्ष सागर बर्गे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक भोसले, सतीश यादव, नितीन महाडिक, हणमंत भिंगारदेवे, नितीन शिंदे, अमोल सकट, विश्वास संकपाळ, केतन जाधव, शंभूराजे भिसे यांच्या वतीने तहसीलदार विजय पवार यांना निवेदन देण्यात आले.

Marathi Board MNS
Karnataka Abortion Racket : धक्कादायक! तीन महिन्यांत 242 भ्रूणहत्या; दोन डॉक्टरांसह नऊ जणांना अटक

निवेदनातील माहिती अशी, महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी भाषेविषयी आदर असणे गरजेचे आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही काही व्यावसायिक दुकानाला मराठीत पाटी लावत नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठी पाट्या लावण्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, कऱ्हाड शहर व तालुक्यातील अनेक दुकानांना अद्याप इंग्रजीत पाट्या आहेत.

Marathi Board MNS
Prakash Ambedkar : नरेंद्र मोदींची नावालाच 56 इंच छाती, ते लोकशाहीसाठी धोकादायक आहेत; प्रकाश आंबेडकरांची टीका

प्रशासनाने अशा दुकानांचा सर्व्हे करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी, तसेच येत्या आठ दिवसांत सर्व दुकानांना मराठीत पाट्या लावण्यात याव्यात अन्यथा मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marathi Compulsory For Rickshaw Drivers But English Signboards At Bus Stations Raise Questions On Maharashtra Transport Policy
SUPREME COURT ON BCCI
VIRAL VIDEO
Kolhapur Teacher Bharti Pavitra Portal
Marathi News Esakal
www.esakal.com