esakal | डॉक्‍टरांची पराकाष्ठा; युवकाची टेस्टिक्‍युलर कर्करोगावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

डॉक्‍टरांची पराकाष्ठा; युवकाची टेस्टिक्‍युलर कर्करोगावर मात

अवघड जागेत दुखणे, श्वास घेण्यास अडचण जाणवणे ही या कर्करोगाची प्रमुख लक्षणे आहेत. रुग्णामध्ये अशी लक्षणे दिसत असल्यास तातडीने कर्करोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचे आहे.

डॉक्‍टरांची पराकाष्ठा; युवकाची टेस्टिक्‍युलर कर्करोगावर मात

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : फलटण येथील एका युवकाने इच्छाशक्तीच्या बळावर शेवटच्या टप्प्यातील कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली आहे. येथील ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये या तरुणावर यशस्वी उपचार करण्यात आले. त्याला झालेला टेस्टिक्‍युलर कर्करोग हा चौथ्या टप्पावर होता. डॉक्‍टरांच्या प्रयत्नांमुळे या तरुणाला नवीन आयुष्य मिळाले आहे. 

लघवीच्या खालील भागात सूज आल्याने हा तरुण उपचारासाठी आला होता. वैद्यकीय तपासणीत त्याला टेस्टिक्‍युलर कर्करोग असल्याचे निदान झाले. हा कर्करोग शेवटच्या टप्प्यामध्ये होता. कर्करोगाचे अचूक निदान व उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. परंतु, चौथ्या टप्प्यातील कर्करोग रुग्णाचा जीव वाचवणं अवघड असते. मात्र, ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमधील मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट (केमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी तज्ज्ञ) डॉ. दत्तात्रय अंदुरे यांनी हे कठीण आव्हान स्वीकारले. डॉक्‍टरांच्या प्रयत्नांमुळे हा तरुण कर्करोगमुक्त झाला असून, त्याला नवीन आयुष्य मिळाले आहे.

#HopeOfLife : अंडकोषाच्या कर्करोगाबाबत जागरूक राहा!  

याबाबत डॉ. अंदुरे म्हणाले, ""हा तरुण उपचारासाठी आलेला असताना तपासणीत त्याला टेस्टिक्‍युलर कर्करोग असल्याचे निदान झाले. भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला याच प्रकारचा कर्करोग होता. कुटुंबीयांच्या परवानगीनुसार या तरुणावर उपचार करण्यात आले. किमोथेरपीनंतर पेटस्कॅन चाचणी करण्यात आली. त्यात अंडाशयात कर्करोगाची गाठ असल्याचे निदान झाले. त्यावर शस्त्रक्रिया करून ही गाठ काढण्यात आली आणि रुग्णाला आणखीन दोन किमोथेरपी सायकल देण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा पेटस्कॅन आणि रक्तचाचणी करण्यात आली. त्यात तरुणाचा कर्करोग पूर्णपणे बरा झाला होता.'' टेस्टिक्‍युलर या कर्करोगावर पटकन उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. या तरुणाला कर्करोग असल्याचे फार उशिरा निदान झाले. पण, या तरुणाने आत्मविश्वासाच्या बळावर शेवटच्या टप्प्यातील कर्करोगावर मात केली आहे. अवघड जागेत दुखणे, श्वास घेण्यास अडचण जाणवणे ही या कर्करोगाची प्रमुख लक्षणे आहेत. रुग्णामध्ये अशी लक्षणे दिसत असल्यास तातडीने कर्करोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

पैसे थकीत ठेवणे पडले महागात; कऱ्हाडातील जमिनी हाेणार सरकार जमा

‘How’s The Josh’! सातारा जिल्ह्यातील शेतकरी कन्या सैन्य दलात; आसाम रायफलमध्ये निवड

खेड ग्रामपंचायतीत दिव्यांग निधीत मोठा भ्रष्टाचार; माहिती अधिकारात माहिती उघड

पालकांच्या मागणीचा विचार न झाल्यास शाळेला टाळे ठोकू; कोपर्डे हवेलीत पोदार स्कूलसमोर निदर्शने

Edited By : Siddharth Latkar

loading image