7 अ‍ॅप्संना चुकूनही करु नका डाऊनलोड; अन्यथा मिनिटात अकाऊंट होईल रिकामं

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 8 January 2021

भारतात इंटरनेट यूजर्ससाठी कस्टमर केअर स्कॅम एक मोठी समस्या बनली आहे.

नवी दिल्ली- भारतात इंटरनेट यूजर्ससाठी कस्टमर केअर स्कॅम एक मोठी समस्या बनली आहे. अनेकदा अशा स्कॅममध्ये फसलेल्या लोकांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. कोणत्याही कंपनीचा कस्टमर केअर नंबर जाणून घेण्यासाठी यूझर्स google वर सर्च करतात आणि तो नंबर डायल करतात. पण, अनेकदा गूगलवर सर्च केलेला कस्टमर केअर नंबर फेक असतो. ज्याला घोटाळेबाजांकडून ऑपरेट केलं जातं. या नंबरवर फोन केल्यानंतर काही तासातच कस्टमरच्या अकाऊंटमधून पैसे गायब होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.  

कोरोना लस मिळण्यासाठी मदत करेल Co-WIN ऍप; जाणून घ्या कसं काम करतं

रिमोट कंट्रोलचे ऍप असतात धोकादायक

कस्टमर केअर फ्रॉडमध्ये सगळ्यात धोकादायक रिमोट कंट्रोलचे ऍप असतात. स्कॅम करणारे यूझर्संना आपल्या मोबाईलवर रिमोट डेस्कटॉप ऍप डाऊनलोड करण्यासाठी भाग पाडतात. रिमोट डेस्कटॉप ऍप अँड्रॉईड फोनवर कशा पद्धतीने काम करते, याविषयी खूप कमी माहिती दिली असते. 

सायबर गुन्हेगार लोकांना मॅसेजच्या माध्यमातूल लिंक पाठवतात आणि त्यानंतर रिमोट अॅक्सेसचे कोणतेतरी ऍप डाऊनलोड करण्यासाठी सांगतात. पण, लोकांना याचा पत्ताही लागत नाही की हे ऍप डाऊनलोड केल्यानंतर त्यांच्या फोनचा अॅक्सेस स्कॅमरच्या हातात जातो. त्यानंतर स्कॅमर फोनमध्ये स्क्रीन रिकॉर्डिंग सुरु करतात. त्यानंतर यूपीआय लॉगिन करण्याच्या दरम्यान फोनमधील ओटीपी जाणून घेतात.  

Agree Or Not Now; तुम्हालाही Whatsapp नोटिफिकेशन आलंय का?

रिमोट कंट्रोलचे मालवेअर ऍप असत नाहीत, हे कामाचे ऍप असतात, पण याचा वापर वाईट गोष्टींसाठीही केला जाऊ शकतो. ज्याचा परिणाम धोकादायक असतो. त्यामुळे यूझर्संना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळे यूझर्संनी कोणाच्या सांगण्यावरुन असे ऍप डाऊनलोड करु नये, तसेच कोणाला आपला ओटीपी शेअर करु नये. 

पुढील सात ऍप्संना मोबाईलमध्ये चुकूनही डाऊनलोड करु नका

1. TeamViewer QuickSupport
2. Microsoft Remote desktop
3. AnyDesk Remote Control
4. AirDroid: Remote access and File
5. AirMirror: Remote support and Remote control devices
6. Chrome Remote Desktop
7. Splashtop Personal- Remote Desktop 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: account will be empty if you download these 7 apps in the phone